लोकसभेसाठी मविआचा फॉर्म्युला ठरला; कोणाला किती जागा? जाणून घ्या

152

वाय बी चव्हाण सेंटरमध्ये बुधवारी महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीतून महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थितीत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केलं होत. याच वेळी लोकसभेसाठीचा महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं समोर आलं आहे. मविआचा लोकसभेसाठी जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा असणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. आता त्याच चर्चेला पूर्णविराम लागला आहे.

मुंबईतल्या ४ जागा ठाकरे गट लढविणार 

मविआनं लोकसभेची निवडणूक एकत्र लढविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात ४८ लोकसभेसाठी जागा आहेत. यापैकी २१ जागा ठाकरे गट, १९ जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि ८ जागा काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. तसंच मुंबईतील ६ पैकी ४ जागा ठाकरे गट लढविणार असल्याची माहिती एका मराठी वृत्तवाहिनीनं दिली आहे. दरम्यान ५ ते ६ जागा अशा आहेत, ज्यावर मविआमध्ये पूर्ण सहमती झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो.

दरम्यान मविआबरोबरच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनेही मोर्चे बांधणी सुरू केली आहे. तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपनं देखील रणनीति आखली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपचं अधिक लक्ष आहे. काही दिवसांपूर्वी भाजपची लोकसभा निवडणुकीची ‘ब्लू प्रिंट’ जारी झाली होती.

(हेही वाचा – सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आशेचा किरण – उद्धव ठाकरे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.