राज्याचे महाविकास आघाडी सरकारचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचेच ज्येष्ठ सहकारी आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा जीव धोक्यात असताना झेड प्लस सुरक्षा का नाकारली असा सवाल शिवसेना प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला. एकनाथ शिंदे यांनी मागणी करुन देखील त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे यातून त्यांचा घातपात करण्याचा उद्धव ठाकरे यांचा डाव होता असा गंभीर आरोपही वाघमारे यांनी यावेळी केला. (Eknath Shinde)
नगरविकास मंत्री आणि नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना एकनाथ शिंदे यांच्या जीवाला धोका होता. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे (Eknath Shinde) यांना झेड प्लस सुरक्षा का नाकारली याचे उत्तर महाराष्ट्रातील जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही डॉ. वाघमारे यांनी केली. स्व:ताच्या पक्षातील एक ज्येष्ठ सहकारी सुरक्षेची मागणी करतो आणि कुटुंबप्रमुख म्हणवणारे उद्धव ठाकरे ती नाकारतात याला स्वपक्षीयांसोबत केलेली गद्दारी का म्हणू नये, अशी खरमरीत विचारणाही डॉ. वाघमारे यांनी केली. (Eknath Shinde)
गद्दार म्हणून आरोप करण्यापूर्वी नकली शिवसेनेने गद्दार शब्द स्व:ताशी किती निगडीत आहे, याचा जरा विचार करावा. शिवसेनेतील झालेल्या बंडाची सुरुवात खूप आधीपासून झाली. त्यामुळे हे एकाच रात्रीत घडलेले नाही. या बंडाला त्यावेळचे शिवसेनेचे नेतृत्व कारणीभूत आहे, असा आरोप करत, यापुढे ठाकरे गटातील गटाबाबत आणखी गौप्यस्फोट करणार असल्याचा इशाराही डॉ. वाघमारे यांनी दिला. (Eknath Shinde)
(हेही वाचा – Congress : गोव्यात आमच्यावर संविधान जबरदस्तीने लादले; काँग्रेसचे उमेदवार विरिटो फर्नांडिस यांचे वादग्रस्त वक्तव्य)
त्यांना आता पंतप्रधानपदाची लालसा…
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मनात आता पंतप्रधानपदाची लालसा उफाळून आली आहे. सत्तेच्या लालसेपोटी त्यांनी महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही बाजुला सारलेले आहे, असाही आरोप डॉ. वाघमारे यांनी केला. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाविकास आघाडी पिछाडीवर आहे. अशावेळी ज्येष्ठ सहकाऱ्याला बाजूला सारणे आणि सत्तेची लालसा दिसून येते. उद्धव ठाकरेंची अवस्था उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग अशी झालेली असून आता नकली शिवसेनेचे मुंगेरीलाल संजय राऊत आहेत, असा सणसणीत टोलाही डॉ. वाघमारे यांनी राऊत यांना लगावला. (Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community