भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होणार, मविआत पडणार मोठं खिंडार; बावनकुळेंचा दावा

146

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे सुपुत्र आणि काँग्रेसचे नेते अमित देशमुख भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू असताना भाजपमध्ये जोरदार इनकमिंग होणार असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. ठाकरे गटाचेही अनेक नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असून फक्त वेळ आणि ठिकाण ठरवायचं बाकी आहे, असं देखील बावनकुळे यांनी सांगितलं आहे.

महाविकास आघाडीमध्ये मोठं खिंडार पडणार – बावनकुळे

‘उच्च स्तरापासून ते विधानसभा, लोकसभा स्तरापर्यंत ज्यांनी काम केलं आहे, असे काँग्रेस आणि राष्ट्रवादी अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात आहेत. त्यामुळे पुढच्या काळात महाविकास आघाडीत खिंडार पडणार आहे. तसेच २०२४मध्ये मविआकडे विधानसभा, लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी उमेदवार नसतील, अशी स्थिती महाराष्ट्रात निर्माण होईल,’ असे बावनकुळे म्हणाले.

‘कोणतीही धुसफूस आमच्यात नसून मविआमध्ये’

यादरम्यान त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीवरही भाष्य केलं. ते म्हणाले की, ‘विधान परिषदेच्या निवडणुकीतून शिंदे गट नाराज असल्याचा प्रश्न नाही. मी दररोज मुख्यमंत्र्यांशी बोलतोय. सगळ्यांशी बोलूनच उमेदवार निश्चित होत आहे. कोणतीही धुसफूस आमच्यात नसून मविआमध्ये आहे. नागपुरात नाना पटोले त्यांच्या लोकांना घेऊन बसले असून ते भांडत आहेत. पण आमच्यात पूर्ण समन्वय आहे.’

(हेही वाचा – …तर राहुल गांधी खाकी पँट घालून RSSच्या दसरा मेळाव्यात दिसतील – नितेश राणे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.