मोठा गौप्यस्फोट! कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना जेलमध्ये टाका, मविआ सरकारने दिले होते आदेश

maha vikas aghadi plan was to put me in the jail said deputy chief minister devendra fadnavis
मोठा गौप्यस्फोट! कोणत्याही परिस्थितीत फडणवीसांना जेलमध्ये टाका, मविआ सरकारने दिले होते आदेश

राज्यातील राजकारणात सध्या विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मौठा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात फडणवीसांना तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असं त्यांनी स्वतः एका मराठी खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितलं आहे.

देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले?

उद्धव ठाकरेंसोबतच्या मैत्रीसंबंधातील प्रश्नाबाबत उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याचा, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. तसेच मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट याठिकाणाचे सीपी संजय पांडे यांना देण्यात आलं होत. अर्थात मी असं काहीच केलं नव्हतं, जेणेकरून मला जेलमध्ये टाकू शकतील. त्यामुळे त्यांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये अडकवा, मला जेलमध्ये टाका, अशाप्रकारचे आदेश मविआ सरकारमधले होते. हे सत्य असून आता पोलीस विभागातील कोणालाही विचारा, ते देखील आपल्याला सांगू शकतील.’ देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे.

एवढंच नाहीतर फडणवीस म्हणाले की, ‘माझ्याकडून कुठलंही वैर नव्हतं. पण उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे दरवाजे बंद केले. आम्ही पाच वर्षे सत्तेत होतो, तरीही ते असं वागले. मी राजकीय वैर ठेवणारा माणूस नाही.’

(हेही वाचा – Nashik Graduate Election: सत्यजित तांबेंना ४० ते ५० संघटनांचा पाठिंबा; वडील सुधीर तांबेंचा दावा)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here