Maha Vikas Aghadi चा २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच

कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागांवर अद्याप पेच

66
Maha Vikas Aghadi चा २६० जागांचा तिढा सुटला, २८ जागांवर प्रचंड रस्सीखेच
  • प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर जागावाटपाबाबत महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) सातत्याने बैठक सुरू आहेत. मुंबईवरून अडकलेल्या जागांच्या पेचामुळे महाविकास आघाडीच्या जागांचं घोडं आणलं होतं. गुरुवारच्या बैठकीत मुंबईतील ३६ पैकी ३३ जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. त्यात काँग्रेस १५, उबाठा शिवसेना १८ आणि राष्ट्रवादी २ आणि समाजवादी पार्टीला १ जागा देण्यावर सहमती झाली आहे. ३ जागांवर अजूनही पेच अडकला आहे. कुर्ला, भायखळा आणि अणुशक्तीनगर या जागा संदर्भात अजूनही रस्सीखेच सुरू आहे. यावर गुरुवारी किंवा शुक्रवारी निर्णय होणार आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : घाटकोपर पश्चिमसाठी शिवसेनेकडे चांगला उमेदवार असल्यास भाजपा करणार जागेची अदलाबदली)

मुंबईच्या सोफिटेल हॉटेलला सुरू असलेल्या मविआ (Maha Vikas Aghadi) नेत्यांच्या बैठकीत आतापर्यंत २६० जागांचा तिढा सुटलेला आहे. उरलेल्या २८ जागांवरती तिन्ही पक्षांकडून रस्सीखेच सुरू आहे. येणाऱ्या दोन दिवसांत यावर निर्णय घेण्यात येणार आहे त्याकरिता तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून निर्णय घेणार आहेत. त्यानंतरच महाविकास आघाडीची उमेदवारांची यादी घोषित करण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.

(हेही वाचा – पुन्हा Train Accident : आसाम-आगारतळा एलटीटी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले)

आजच्या बैठकीपूर्वी मविआत (Maha Vikas Aghadi) २०० जागांवर एकमत झालं होते, विधानसभा निवडणूक जाहीर झाल्याने २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यामुळे तिन्ही पक्षातील जागावाटप लवकर सुटावे यासाठी सकाळपासून मविआ नेते बैठकीला बसले आहेत. या बैठकीत संजय राऊत, नाना पटोले, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, सतेज पाटील आणि इतर नेते उपस्थित आहेत. त्यात आतापर्यंत २६० जागांवर एकमत झाल्याचं सांगण्यात आले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.