वंचित बहुजन आघाडीवरून महाविकास आघाडीत पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तर काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधाभास दिसून येत आहे. (Mahavikas Aghadi)
तर अकोल्याच्या जागेसंदर्भात पुनर्विचार
वंचित बहुजन आघाडीने राज्यातील सात मतदार संघात काँग्रेस उमेदवारांना पाठींबा देणार असल्याचे घोषित केले होते. यावर बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना, वंचितने सात उमेदवारांना पाठिंबा दिल्यास ते लढत असलेल्या अकोला जागेवर त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी सांगितले, “प्रकाश आंबेडकर जर काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देत असतील तर अकोल्याच्या जागेसंदर्भात पुनर्विचार व्हावा, अशी अनेक काँग्रेस कार्यकर्ते आणि नेत्यांची मागणी आहे. ते आम्ही हाय-कमांडला कळवलं आहे आणि त्यावर ते निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.” अकोला मतदार संघातून प्रकाश आंबेडकर वंचित आघाडीकडून निवडणूक लढवणार आहेत. (Mahavikas Aghadi)
(हेही वाचा – Dharavi Redevelopment Project : कमला रामन नगरपासून कागदपत्रे गोळा करण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण सुरू)
कुणालाही पाठिंबा मागितला नाही
तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र ‘आम्ही कुणालाही पाठिंबा मागितला नाही’, असे वंचितबाबतच्या एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले ‘पाठिंबा द्यायचा असेल तर महाविकास आघाडीतील सर्व पक्षांना पाठिंबा द्यावा’. त्यामुळे वंचितचा पाठिंबा घेण्यावरून काँग्रेसमध्येही एकमत नसून अंतर्गत वाद असल्याचे उघड झाले आहे. पटोले यांच्यावर आंबेडकर यांनी टीका केल्याने पटोले यांनी वंचितविरोधात भूमिका घेतल्याचे समजते. (Mahavikas Aghadi)
नव्या वादाची ठिणगी
दरम्यान, वंचितने जर काँग्रेसच्या सात जागांवर पाठींबा जाहीर केला आणि अकोला मतदार संघात आंबेडकर यांच्यासमोर उमेदवार दिला नाही किंवा पाठींबा जारी दिला तरी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि शिवसेना उबाठा यांच्यात नव्या वादाची ठिणगी पडू शकते, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. (Mahavikas Aghadi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community