Maha Vikas Aghadi एकत्र विधानसभा लढणार; के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

79
Maha Vikas Aghadi एकत्र विधानसभा लढणार; के. सी. वेणुगोपाल यांची घोषणा

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष बसून एकत्रित जागावाटपाची चर्चा करून निर्णय घेऊ अशी माहिती काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व केंद्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी (१९ जुलै) पत्रकार परिषदेत दिली. (Maha Vikas Aghadi)

(हेही वाचा – Budget : पंतप्रधान आवास योजनेची उत्पन्न मर्यादा कमी होण्याची शक्यता)

क्रॉस व्होटिंग करणाऱ्यांवर पक्षाने केली कारवाई

पत्रकारांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना खासदार वेणुगोपाल म्हणाले की, विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात अजिबात बेशिस्त खपवून घेतली जाणार असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. (Maha Vikas Aghadi)

यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या बैठकीत विधानसभा तयारीसंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली असून २० ऑगस्टला महाराष्ट्रतील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. (Maha Vikas Aghadi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.