महाविकास आघाडीतून माढा लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर (Mahadev Jankar) यांना दिल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी मोठी खेळी करत महादेव जानकर यांना एक जागा देऊ करत महायुतीमध्ये परत आणले. आता महायुतीमधून महादेव जानकर हे परभणीमधून अधिकृत उमेदवार असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महादेव जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली.
(हेही वाचा Lok Sabha Election 2024: भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शनिवारी अखेरचा दिवस)
राष्ट्रवादीच्या कोट्यातून परभणीची जागा सोडण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली. त्यामुळे आता परभणीमध्ये महादेव जानकर (Mahadev Jankar) हे लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत. त्यांची लढत शिवसेना ठाकरे गटाच्या संजय जाधव यांच्याशी होणार आहे. सुनील तटकरे यांनी महायुतीकडे सहा ते सात जागा मागितल्याची माहिती दिली. रायगडमधून सुनील तटकरे हे रिंगणात असणार आहेत. बारामतीमधून सुनेत्रा पवारांची उमेदवार निश्चित आहे, तर शिरूरमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी निश्चित असणार आहे. दरम्यान, बारामतीच्या जागेवरती आज घोषणा केली जाणार का? याकडे लक्ष होते. मात्र अजून कोणतीही घोषणा केलेली नाही. मात्र, तेथून बंड केलेल्या विजय शिवतारे यांना शांत करण्यात यश आलं आहे.
Join Our WhatsApp Community