Mahadev Jankar महायुतीतून बाहेर? पुण्याच्या महायुती बैठकीचं महादेव जानकरांना निमंत्रण नाही

महादेव जानकर हे परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे काही नेतेही जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढावे, यासाठी प्रयत्न करत आहेत.

210
Mahayuti मध्ये येऊन महादेव जानकर फसले का?

बारामती, पुणे, शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सोमवारी (०४ मार्च) पुण्यात बैठक होणार आहे. मंत्री चंद्रकांत पाटील बारामती, पुणे, शिरूर लोकसभेतील पदाधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत. असे असताना देखील मात्र बैठकीला महादेव जानकर (Mahadev Jankar), सदाभाऊ खोत यांना निमंत्रण मिळालं नाही. अश्यातच “आमंत्रण नाही तर जाऊ कशाला” असं वक्तव्य महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बोलून दाखवले. (Mahadev Jankar)

रासपला माढा लोकसभा देऊन बारामतीचा गढ राखण्याचा पवारांचा डाव

महादेव जानकर (Mahadev Jankar) महायुतीतून बाहेर होणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. राज्यात महायुतीचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला शरद पवार यांनी मोठी ऑफर दिली आहे. राष्ट्रीय समाज पार्टीचे अध्यक्ष महादेव जानकर महाविकास आघाडी सोबत आल्यास त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल, असं विधान शरद पवार यांनी बारामतीत गोविंदबागेत पत्रकारांशी बोलतांना केलं आहे. (Mahadev Jankar)

महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या जागावाटपात बारामतीसह एकूण ९ ते १० जागा मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार आग्रही आहेत. माढा लोकसभा मतदारसंघ जानकरांना देण्यास शरद पवार तयार आहेत. यातच महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचे सुत्र आता अंतिम टप्प्यात आले असून येथे सहा ते सात मार्च रोजी मुंबईत या संदर्भातील बैठक होणार आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर सोबत आल्यास त्यांना मी माझी लोकसभेची जागा त्यांना द्यायला तयार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. (Mahadev Jankar)

यातच महादेव जानकर (Mahadev Jankar) यांचे अनेक समर्थक तसेच येथे असलेला धनगर समाजाची बारामतीत असलेलं प्राबल्य याचा फायदा सुप्रिया सुळे यांना होऊ शकतो. त्यांचा बारामती लोकसभा मतदारसंघात चांगला प्रभावही आहे. जानकरांना माढा लोकसभा मतदारसंघ दिला तर जानकर बारामतीत सुप्रिया सुळे यांना ताकद देतील. त्यामुळे आता जानकर काय निर्णय घेणार? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Mahadev Jankar)

(हेही वाचा – Pune Traffic Update: पुणे शहरात मंगळवारपासून होणार वाहतुकीत मोठे बदल, कोणत्या पर्यायी मार्गांचा कराल वापर; जाणून घ्या…)

माढा की परभणी यावर विचार सुरू

महादेव जानकर (Mahadev Jankar) हे परभणी आणि माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरण्याची चाचपणी करत आहेत. राष्ट्रीय समाज पक्षाचे काही नेतेही जानकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. गेल्या दोन महिन्यापासून रासपची माढा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रात तयारी सुरू आहे. महादेव जानकर हे धनगर समाजाचे नेते आहेत. या मतदारसंघात धनगर समाज बहुसंख्येने मतदार आहेत. ही जमेची बाजू आहे. या मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकर हे भाजपचे खासदार आहेत. जानकर (Mahadev Jankar) हे सध्या तरी महायुतीमध्ये आहेत. परंतु ही जागा त्यांना मिळण्याची परिस्थिती नाही. तर जानकर हे सत्ताधाऱ्यांविरोधात अनेकदा बोलताना दिसत आहेत. त्यामुळे ते ऐनवेळी महाविकास आघाडीत जातील, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Mahadev Jankar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.