राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर भाजप पुन्हा एकदा सत्तेत आला आहे. नव्याने घोषित करण्यात आलेल्या राज्य मंत्रिमंडळात भाजपाच्या नेत्यांकडे भरभक्कम खाती देण्यात आली असतानाच पंकजा मुंडे यांना मात्र मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे मुंडे समर्थकांमध्ये असलेल्या नाराजी आणखीनच वाढली आहे.
त्यातच पंकजा मुंडे भाजप सोडण्याच्या चर्चांना उधाण आलेलं असतानाच राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी या चर्चंना पूर्णविराम लावला आहे. पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना आपला भाऊ मानले आहे. आता जानकरांनीच पंकजा मुंडे यांच्या भाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे.
प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असते
पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत, त्या भाजपमध्येच राहणार आहेत. त्या,त्यांचे वडील आणि त्यांच्या बहिणीचे आयुष्य भाजपमध्ये गेले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षात जाणार नाहीत. प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच त्यामुळे त्या भाजप सोडून जाणार नाहीत, असे सांगितले आहे.
कॅबिनेट मंत्रीपदासाठी फडणवीसांकडे मागणी
राष्ट्रीय समाज पक्ष हा एनडीएच्या घटक पक्षांपैकी एक आहे. त्यामुळे रासपला कॅबिनेट मंत्रीपद मिळावं अशी मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. त्यामुळे आता तो निर्णय त्यांच्याकडे असून ते याबबात योग्य तो निर्णय घेतील, असेही महादेव जानकर यांनी म्हटले आहे.
Join Our WhatsApp Community