Mahakumbh 2025 : महाकुंभमध्ये आजारी पडणाऱ्या अन्य राज्यातील आणि परदेशी नागरिकांशी एआयच्या मदतीने होणार संभाषण

125

उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 13 जानेवारी 2025 पासून महाकुंभ (Mahakumbh 2025) सुरू होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाकुंभला संस्मरणीय आणि भव्य बनवण्यासाठी कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत. त्यासाठी ते सातत्याने अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन आवश्यक ते निर्देशही देत आहेत. महाकुंभ 12 वर्षातून एकदाच होतो.

योगी सरकार महाकुंभातील (Mahakumbh 2025) प्रत्येक गोष्टीसाठी विशेष तयारी करत आहे. महाकुंभात देशभरातून आणि जगभरातून भाविक संगम नगरीत जमणार आहेत. या काळात बाहेरच्या राज्यातून किंवा परदेशातून येणारे भाविक आजारी पडल्यास भाषेच्या समस्येमुळे त्यांचे उपचार थांबवले जात नाहीत. एआय ट्रान्सलेटर ॲपच्या मदतीने ते डॉक्टरांना त्यांच्याच भाषेत आजाराबद्दल सांगू शकतील. एआय ट्रान्सलेटर ॲप 22 भारतीय आणि 19 परदेशी भाषांना सपोर्ट करते. जे ॲप हिंदी किंवा इंग्रजीमध्ये रूपांतरित होईल.

(हेही वाचा लातूर जिल्ह्यातील १०३ शेतकऱ्यांच्या जमिनीवर Waqf Board चा दावा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही अन्याय…)

ॲपमध्ये अनेक भाषा असतील

या ॲपमध्ये तमिळ, तेलगू, मल्याळम, बंगाली आणि इतर राज्यांच्या भाषा आहेत. तर, इंग्रजी, अरबी, फ्रेंच यासह 19 आंतरराष्ट्रीय भाषा आहेत. देश-विदेशातून येणाऱ्या रुग्णांना उपचार मिळावेत, यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कॅन्टोन्मेंट हॉस्पिटलमध्ये उपस्थित डॉक्टरांच्या फोनमध्ये हे ॲप बसवण्यात येणार आहे.

रुग्णालयात एआय कॅमेरे बसवण्यात येणार

कॅन्टोन्मेंट जनरल हॉस्पिटलमध्ये एआय कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. लखनऊचे वरिष्ठ डॉक्टर या कॅमेऱ्यांद्वारे रुग्णांवर नजर ठेवतील. एआय कॅमेऱ्यांच्या मदतीने रुग्णांच्या बिघडलेल्या आरोग्याची माहिती आपोआप डॉक्टरांपर्यंत पोहोचेल. महाकुंभाच्या (Mahakumbh 2025) पार्श्वभूमीवर रुग्णांच्या उपचारासाठी एआय ट्रान्सलेटर ॲपचा वापर करण्यात येत आहे. हा प्रयोग देशातील कोणत्याही रुग्णालयात प्रथमच केला जात आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.