जगातील सर्वात मोठं धार्मिक आयोजनांपैकी एक महाकुंभ 2025 (Mahakumbh 2025) चा शुभारंभ आज (१३ जानेवारी) होत आहे. पुढील 45 दिवस सुरू असणाऱ्या या महाकुंभ मेळाव्यात 30 कोटींहून अधिक भाविक सहभागी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रयागराजमध्ये (Prayagraj) आज महाकुंभचा दिमाखदार शुभारंभ होणार असून पहिलं शाही स्नान आज पार पडणार आहे. पौष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर 50 लाख भाविक गंगेत स्नान करणार आहेत. (Mahakumbh 2025)
हेही वाचा-Mahakumbh 2025 चा प्रयागराजमध्ये शुभारंभ; PM Modi यांनी दिल्या शुभेच्छा, म्हणाले …
१४४ वर्षांतून एकदाच घडणाऱ्या या दुर्मिळ खगोलीय योगायोगाबद्दल भाविकांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दरम्यान, महाकुंभ मेळाव्यात विदेशी भाविकांचा उत्साहदेखील पाहायला मिळत आहे. यादरम्यान, रशियन, स्पॅनिश, आफ्रिकन भाविकांनी माध्यमांशी संवाद साधला. (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj | A Russian devotee at #MahaKumbh2025, says, “…’Mera Bharat Mahaan’… India is a great country. We are here at Kumbh Mela for the first time. Here we can see the real India – the true power lies in the people of India. I am shaking because of the vibe of the… pic.twitter.com/vyXj4m4BRs
— ANI (@ANI) January 13, 2025
महाकुंभात सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक आले आहेत. महाकुंभाचे दिव्यत्व पाहून एका रशियन भक्ताने म्हटलं की, ‘भारत महान आहे. आपण पहिल्यांदाच कुंभमेळ्यासाठी आलो आहोत. इथे आपल्याला खरा भारत पाहायला मिळाला. या पवित्र स्थानाच्या उर्जेने मी प्रभावित झाली आहे. मला भारत आवडतो.’ (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj | A devotee from South Africa’s Cape Town at #MahaKumbh2025, says, “It’s so beautiful. The streets are clean, the people are so friendly and happy… We practice Sanatan Dharm…” pic.twitter.com/Q5PUnSriuy
— ANI (@ANI) January 13, 2025
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथील एका भक्ताने सांगितलं की, ‘येथील वातावरण अद्भुत आहे. रस्ते स्वच्छ आहेत आणि लोक खूप मैत्रीपूर्ण आहेत. आम्ही सनातन धर्माचं पालन करतो आणि इथे येऊन आम्हाला मिळालेला अनुभव अविस्मरणीय आहे.’ (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj | A devotee from South Africa’s Cape Town at #MahaKumbh2025, Nikki says, “It’s very very powerful and we are very blessed to be here at river Ganga…” pic.twitter.com/Zv9d8OkQjV
— ANI (@ANI) January 13, 2025
दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनहून महाकुंभमेळ्याला आलेली निक्की ही भक्त, येथील अद्भुत वातावरण पाहून भारावून गेली आहे. आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की, ‘हा अनुभव खूप शक्तिशाली आहे. गंगा नदीवर असण्याचा आम्हाला खूप आनंद आणि आमचं भाग्य वाटत आहे.’ (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj | A Spanish devotee at #MahaKumbh2025, Jose says, “We are many friends here – from Spain, Brazil, Portugal… We are on a spiritual trip. I took holy dip and I enjoyed it much, I am very lucky.” pic.twitter.com/YUD1dfBgM4
— ANI (@ANI) January 12, 2025
कुंभमेळ्याला आलेल्या स्पेनमधील एका भाविकाने सांगितलं की, ‘आमचे बरेच मित्र इथे आले आहेत – स्पेन, ब्राझील, पोर्तुगाल येथून आले आहेत. आपण एका अध्यात्मिक प्रवासात आहोत. मी पवित्र स्नान केलं आणि त्याचा पुरेपूर आनंद घेतला. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. महाकुंभ २०२५ हा केवळ भारतीय संस्कृतीचा उत्सव नाही तर तो संपूर्ण जगाला भारताच्या आध्यात्मिक शक्ती आणि संस्कृतीची झलक दाखवत आहे.’ (Mahakumbh 2025)
45 हजार पोलीस कर्मचारी तैनात..
सुरक्षेचा विचार करता यंदा सुरक्षेत 55 हून अधिक फोर्स सामील झाले आहेत. या आयोजनादरम्यान तब्बल 45,000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. हरवलेल्या आणि सापडलेल्या व्यक्तींची माहिती संगणकात नोंदवली जाईल आणि माहिती देणाऱ्याला संगणकीकृत पावती दिली जाईल. बेपत्ता व्यक्तींचे फोटो आणि तपशील एका मोठ्या 55 इंचाच्या एलईडी स्क्रीनवर प्रसारित केले जातील. सर्व केंद्रे आधुनिक संपर्क प्रणालीद्वारे एकमेकांशी जोडलेली आहेत. फेसबुक, एक्स, व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे देखील माहिती प्रसारित केली जाईल. (Mahakumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community