सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर निर्देश सिंग या महिला हिंदू धर्मातील श्रद्धास्थान असलेले भगवान श्रीकृष्ण, श्रीराम, सीता, द्रौपदी यांच्या विषयी अश्लील भाषेत पोस्ट करून त्यांचा अवमान केला आहे. तसेच सध्या महाकुंभ मेळा (Mahakumbh) सुरु आहे. त्याविषयीदेखील धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट केल्या आहेत. त्यामुळे या निर्देश सिंग (Nirdesh Singh) यांच्या विरोधात वकील अमिता सचदेव यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
याआधीही आपण हिंदुद्वेष्ट्या पत्रकार राणा अयुब यांनी भगवान श्रीराम, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करणाऱ्या पोस्ट केल्या होत्या. त्याविरोधात आधी सायबर कडे तक्रार केली होती. मात्र सायबर सेलने त्यावर कार्यवाही केली नाही, म्हणून त्यांनी दिल्ली न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने याप्रकरणी राणा अयुब यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. याचप्रकारे जर याही प्रकरणात पोलीस निष्क्रिय राहणार असेल तर आपण याही प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे.
– वकील अमित सचदेवा
निर्देश सिंग (Nirdesh Singh) यांनी केलेली आक्षेपार्ह विधाने, व्हिडिओ आणि पोस्ट केवळ धार्मिक भावना दुखावणाऱ्या नाहीत, तर भारतीय दंड संहिता (IPC) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) च्या विविध कलमांखाली फौजदारी गुन्हा झाल्याचे सिद्ध होते. त्यामुळे निर्देश सिंग यांच्या विरोधात कलम 153A IPC/196 BNS (विविध गटांमधील वैर वाढवणे); कलम 295A IPC/299 BNS (धार्मिक भावना भडकावण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक आणि दुर्भावनापूर्ण कृत्ये) आणि कलम 500 IPC/356 BNS (मानहानी) नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वकील सचदेवा यांनी केली आहे.
निर्देश सिंग (Nirdesh Singh )या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह सामग्री प्रसारित करतात. ज्यामुळे समाजात द्वेषभावना पसरली जात आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे साकेत सायबर पोलीस ठाण्याने त्वरित या तक्रारीची दखल घेऊन निर्देश सिंग हिच्या विरोधात गुन्हा दाखल करावा. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून आक्षेपार्ह पोस्ट काढून टाकव्यात. या कारवाईसाठी कुणी विलंब केला तर विलंबासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना यामध्ये जबाबदार धरावे. द्वेषयुक्त भाषण आणि सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या अपमानजनक सामग्रीचा आणखी प्रसार रोखण्यासाठी या समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असा पुनरुच्चार वकील सचदेवा यांनी केला.
Join Our WhatsApp Community