Mahakumbh Mela 2025: महाकुंभात महागर्दी ; आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे स्नान

48
Mahakumbh Mela 2025: महाकुंभात महागर्दी ; आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे स्नान
Mahakumbh Mela 2025: महाकुंभात महागर्दी ; आतापर्यंत ६० कोटी भाविकांचे स्नान

उत्तर प्रदेशातील (UP) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभामध्ये (Mahakumbh Mela 2025) आतापर्यंत ६० कोटी भाविकांनी स्नान केल्याची माहिती उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी (22 फेब्रु.) दिली आहे. १३ जानेवारीला सुरू झालेला हा महाकुंभ (Mahakumbh Mela 2025) बुधवारी, २६ फेब्रुवारीला समाप्त होणार आहे. १४४ वर्षांनंतर आलेल्या या महाकुंभ मेळ्याचे आता अवघे चार दिवस उरले आहेत. यामुळे भाविकांची गर्दी वाढली असून, शहरात येणाऱ्या सर्व बाहेरून येणारी वाहने थांबवली जात आहेत.

निम्म्यापेक्षा जास्त भाविकांचे संगमावर स्नान
राज्य सरकारने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात हिंदू धर्माचा उल्लेख सनातन धर्म असा करण्यात आला आहे. त्यामध्ये नमूद केल्यानुसार, भारतातील १.१० अब्ज सनातन धर्मीयांपैकी निम्म्यापेक्षा जास्त भाविकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. महाशिवरात्रीच्या अमृत स्नानापर्यंत ६५ कोटी सनातनी भाविकांनी स्नान केले असेल. या महाकुंभामध्ये कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक किंवा सामाजिक सोहळ्यामधील सर्वात मोठा सहभाग दिसून आल्याचा दावाही उत्तर प्रदेश सरकारने केला आहे. (Mahakumbh Mela 2025)

हेही वाचा-‘महाकुंभ’ साठी Central Railway ने मुंबईतून दिल्या ८२३ ट्रेन सेवा

वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूच्या आकडेवारीनुसार, सध्या भारताची लोकसंख्या १४३ कोटी असून त्यामध्ये ११० कोटी हिंदू धर्मीय आहेत. प्यू रिसर्चच्या माहितीनुसार जगभरात हिंदू धर्मीयांची संख्या १.२० अब्ज इतकी आहे. उत्तर प्रदेशने दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील ५० टक्के हिंदू भाविकांनी आतापर्यंत त्रिवेणी संगमावर स्नान केले आहे. एकट्या नेपाळमधून ५० लाख भाविकांनी स्नान केल्याचे उत्तर प्रदेश सरकारचे म्हणणे आहे. त्याशिवाय जगभरातील ७३ मुत्सद्दी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी त्रिवेणी संगम स्नान केल्याचे राज्य सरकारच्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. (Mahakumbh Mela 2025)

हेही वाचा- Veer Savarkar यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर स्मारकात ‘माझी जन्मठेप’चा रंगमंचीय नाट्याविष्कार सादर

  • मौनी अमावस्येच्या दिवशी सर्वाधिक आठ कोटी भाविकांचे स्नान (Mahakumbh Mela 2025)
  •  मकरसंक्रातीला ३.५० कोटी
  •  पौष पौर्णिमेला १.७ कोटी
  •  वसंतपंचमीला २.५७ कोटी
  •  माघ पौर्णिमेला २ कोटी
  •  १८ फेब्रुवारीपर्यंत ५५ कोटी
  •  २२ फेब्रुवारीपर्यंत ६० कोटी
  •  महाशिवरात्रीपर्यंत ६५ कोटी भाविक स्नान करण्याची अपेक्षा

बाहेरून ५८ हजारांहून अधिक वाहनांचे आगमन
शनिवारी सकाळी १० वाजेपर्यंतच प्रयागराजमध्ये बाहेरून ५८ हजार वाहने आली होती. या सर्व वाहनांच्या पार्किंग व्यवस्थेसह भाविकांना सुविधा पुरवण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. यासाठी जागोजागी पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत. (Mahakumbh Mela 2025)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.