वृंदावन, मथुरा येथील आचार्य वेदाचार्य पंडित गंगाधर पाठक (Acharya Vedacharya Pandit Gangadhar Pathak) यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालांना एक विशेष पत्र लिहून नाशिकचे महंत पीठाधिश्वर अनिकेतशास्त्री देशपांडे यांची राज्यपालनियुक्त आमदार पदावर नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. या पत्रात पंडित पाठक यांनी महंत पीठाधिश्वर अनिकेतशास्त्री (Mahant Aniket Shastri) यांच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यातील व्यापक योगदानाचा उल्लेख केला आहे.
( हेही वाचा : Kurla Best Bus Accident : ‘हिंदुस्थान पोस्ट’च्या वृत्तानंतर तात्काळ कुर्ला स्थानकातून बेस्ट बस सेवा सुरू)
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान
या पत्रात म्हटले आहे की, महंत पीठाधिश्वर अनिकेतशास्त्री (Mahant Aniket Shastri) यांनी केवळ आपल्या नाशिकच नव्हे, तर राज्य आणि देशाच्या विकासात अभूतपूर्व भूमिका बजावली आहे, विविध राजकीय अडचणींना तोंड देत ते नेहमीच लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी सक्रीय राहिले आहेत. समाजातील प्रत्येक विभागात त्यांचा व्यापक प्रभाव आणि आत्मीयता आहे. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यात उल्लेखनीय योगदान दिले आहे.
राज्याचा सांस्कृतिक वारसा बळकट करण्यास मदत
पंडित पाठक (Acharya Vedacharya Pandit Gangadhar Pathak) यांनी लिहिले आहे की, भारतीय संस्कृती आणि संत परंपरा समृद्ध करण्यात महाराष्ट्र राज्याने ऐतिहासिक भूमिका बजावली आहे. या राज्यात संत-विद्वानांना घटनात्मक अधिकार द्यावेत. त्यामुळे नाशिक आणि आसपासच्या भागातील विकासाला चालना मिळेल. या निर्णयामुळे संत समाजाचे कल्याण, तसेच राज्याचा सांस्कृतिक वारसा बळकट होईल.
यापूर्वी झाली आहे शिफारस
५ सप्टेंबर २०१८ या दिवशी राज्याचे कक्ष अधिकारी टि एन शिखरामे यांनी राज्याचे अवर सचिव यांनाही वैदिक, वैष्णव किंवा शैव परंपरेतील सन्मानित व्यक्तीची मंत्री किंवा राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. १० नोव्हेंबर २०२२ या दिवशी तत्कालीन सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनीही महंत पीठाधिश्वर अनिकेतशास्त्री (Mahant Aniket Shastri) यांची सांस्कृतिक मंत्रायलाअंतर्गत राज्यमंत्री दर्जा किंवा यथायोग्यपदी नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community