अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर, श्रीलंकेच्या वाणिज्यदूतांनी केले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

96

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ महापरिनिर्वाण दिनानिमित्त अर्जेंटिना, आयर्लंड, इंडोनेशिया, सिंगापूर आणि श्रीलंकेच्या वाणिज्यदूतांनी चैत्यभूमी येथे उपस्थित राहून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.

( हेही वाचा : शिवसेना उद्धव ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर पुढील सुनावणी होणार ‘या’ तारखेला!)

New Project 29

महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अर्जेंटिनाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख मारिया यापुर, आयर्लंडचे कौन्सिल जनरल अल्सोन रीलेटी, इंडोनेशियाचे कौन्सिल जनरल अगुस सप्तनो, सिंगापूरचे कौन्सिल जनरल झिकिचेस, श्रीलंका या देशांचे कौन्सिल जनरल वलस्तन वाठोडी या अभिवादन प्रसंगी उपस्थित होते. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी – शर्मा आणि मुख्य व्यवस्थापक चंद्रशेखर जैस्वाल यावेळी उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.