अमृता फडणवीस यांच्या तक्रारीनंतर देवेंद्र फडणवीस यांचे विधानसभेत धक्कादायक खुलासे

172

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक डिझायनर आणि तिच्या वडिलांविरोधात एक कोटीची लाच देण्याचा प्रयत्न आणि धमकवल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे. आता याच प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत धक्कादायक खुलासे केले आहेत.

काय म्हणाले फडणवीस?

अमृता फडणवीस यांनी एक एफआयआर दाखल केला असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले की त्यांच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करण्याकरता प्रयत्न झाला. आधी पैसे देण्याचा आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. अनिल जयसिंघांनी नावाची एक व्यक्ती गेली सात-आठ वर्षे फरार असून तिच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. या व्यक्तीची एक मुलगी 2015 ते 2016 दरम्यान अमृता फडणवीस यांना भेटत होती. त्यानंतर भेटणे बंद झाले आणि अचानक या मुलीने माझ्या पत्नीला भेटणे सुरु केले. त्यावेळी तिने मी डिझायनर असल्याचे सांगितले. त्यासोबत तिने माझी आई वारली असून मी तिच्यावर एक पुस्तक लिहिले असून त्याचे प्रकाशन तुम्ही करा, असे माझ्या पत्नीला सांगितले, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

( हेही वाचा: मविआचे सरकार पाडण्यासाठी शिंदेंनी राज्यपालांचा वापर केला ; कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद )

……म्हणून तुम्ही मला मदत करा

तिने विश्वास संपादन केला आणि येणे जाणे सुरु केले. त्यानंतर तिने हळूच सांगितले की माझ्या वडिलांना एका प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना सोडवा. त्यानंतर माझ्या पत्नीने त्यांना निवदेन देण्यास सांगितले. तसेच, तिने हेही सांगितले की माझे वडिल सगळ्या बुकीजना ओळखतात. मागच्या काळात आम्ही माहिती द्यायचो आणि त्यानंतर छापे पडायचे. त्या छाप्यामध्ये आम्हाला दोन्ही बाजूने पैसे मिळायचे. तुम्ही थोडी मदत केली तर आपणही असे छापे मारु शकतो. त्यावेळी माझ्या पत्नीने याकडे लक्ष दिले नाही आणि या गोष्टी माझ्यासोबत बोलू नको असे सांगितले. तसेच, माझ्या वडिलांना सोडवण्यासाठी 1 कोटी देते असेही सांगितले. ती या विषयावर वारंवार बोलायला लागल्यावर माझ्या पत्नीने तिचा नंबर ब्लाॅक केला.

यानंतर एका अनोळखी क्रमांकावरुन काही व्हिडीओ आणि क्लिप आल्या. त्यामध्ये तिने अमृता फडणवीस यांचे संभाषण रेकाॅर्ड केले होते. यातल्या एका व्हिडीओमध्ये ही मुलगी एका पिशवीत पैसे भरत असल्याचे दिसते आहे. तर दुस-या एका व्हिडीओमध्ये तशीच बॅग ती मुलगी आमच्या घरी काम करणा-या मोलकरणीला देण्यात आल्याचे दाखवते आहे. त्यानंतर तिने धमक्या दिल्या आणि माझ्या वडिलांची मदत करा नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल करु अशी धमकी दिली, असे फडणवीस म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.