Maharashtra Foreign Investment : परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल

131
Maharashtra Foreign Investment : परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र पुन्हा अव्वल

एकीकडे भारत जगातील पाचवी अर्थव्यवस्था बनली आहे तर दुसरीकडे राज्यातील (Maharashtra Foreign Investment) परकीय गुंतवणुकीमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ही महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात ३६ हजार ६३४ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

दुसर्‍या, तिसर्‍या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा महाराष्ट्रात (Maharashtra Foreign Investment) आलेला एफडीआय म्हणजेच परकीय गुंतवणूक अधिक आहे.

वर्ष २०२२-२३ मध्ये १,१८,४२२ कोटींची प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक (Maharashtra Foreign Investment) आकर्षित करुन पहिल्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र २०२३-२४ या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत सुद्धा पहिल्याच क्रमांकावर आहे. डीपीआयआयटीने एप्रिल ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ३६,६३४ कोटी रुपये विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे.

(हेही वाचा – Anurag Thakur : आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत उत्कृष्ट कामगिरी करेल – अनुराग ठाकूर)

गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती

गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला (Maharashtra Foreign Investment) पसंती आहे. महाराष्ट्रला २०१९ पर्यंत पहिल्या स्थानावर ठेवलं होतं. पण ठाकरे सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य बरंच मागे पडलं आणि गुजरात पहिला क्रमांकावर गेलं. मात्र आम्ही पुन्हा एकदा मागील एका वर्षात महाराष्ट्रला गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणलं आता तिमाही रिझल्ट आले आहे. जिओ पॉलिटिकल सिच्युएशनमुळे फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट जरी कमी झाली असली तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी सत्तेत आल्यावर आम्ही घोषणा केली होती. महाराष्ट्र गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर आणू ते पूर्ण झालं आहे.

महाराष्ट्रात किती गुंतवणूक आली?

गेल्या साडेतीन वर्षांत राज्यात सुमारे चार लाख कोटींची विदेशी गुंतवणूक (Maharashtra Foreign Investment) करण्यात आली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा २९ टक्के आहे. एप्रिल ते जून २०२३ या कालावधीत महाराष्ट्रात ३६ हजार ६३४ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली आहे. देशभरातील एकूण गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा २९ टक्के आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात १ लाख १८ हजार कोटींची गुंतवणूक आली आहे. देशात राज्याचा पहिला क्रमांक आहे. ऑक्टोबर २०१९ ते मार्च २०२३ या काळात महाराष्ट्रात चार लाख सात हजार कोटींची एकत्रित गुंतवणूक झाली. याच काळात कर्नाटकात २४ टक्के, गुजरातमध्ये १७ टक्के तर २९ टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राखालोखाल कर्नाटक, , गुजरात, दिल्ली तेलंगणा या राज्यांचा क्रमांक लागतो.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.