राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे एक-दोन नव्हे, तर तब्बल 35 आमदार नाॅटरिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची शक्यता आहे. यातच आता मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतरणाच्या चर्चेला वेग आला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गंभीर पावले उचलली जात आहेत. एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी उघड बंड पुकारल्यानंतर, आता शिवसेनेने राज्यातील सर्व खासदारांची बैठक आयोजित केली आहे. वर्षा निवासस्थानावर ही बैठक होणार आहे.
( हेही वाचा: शिवसेना आमदार भाजपला सत्तास्थापनासाठी देणार पाठिंबा; अमित शहा घेणार आमदारांची भेट? )
आमदारांच्या बैठकीत ते दोन आमदार पोहोचले
बंडखोर आमदारांमध्ये ज्या दोन आमदारांची नावे घेतली जात होती, त्या दोन्ही आमदारांनी वर्षावर बैठकीला हजेरी लावली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदेंप्रमाणे बंडखोरी करु पाहणा-या आमदारांना शोधून वर्षा निवासस्थानावर आणले जात आहे. यात संजय राठोड आणि दादा भुसे यांनाही आणले गेले.