Maharashtra Assembly session: विधानभवनातील शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील

106

महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्ष संपल्यानंतर आज, रविवारपासून दोन दिवसीय विशेष अधिवेश बोलविण्यात आले आहे. यादरम्यान विधानसभा अध्यक्ष निवडणूक आणि उद्या बहुमत चाचणी घेण्यात येणार आहे. मात्र आज विधानसभेचे सत्र सुरू होण्यापूर्वीच शिवसेनेचे विधिमंडळातील कार्यालय सील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

(हेही वाचा – माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांना धक्का, शिवसेनेतून हकालपट्टी!)

विधानभवनातील शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील केले असल्याची नोटीस शिवसेनेच्या विधिमंडळातील कार्यालयाच्या दरवाज्यावर लावण्यात आली आहे. यामुळे शिवसेना विधिमंडळ कार्यालयातील सर्व कर्मचारी देखील कार्यालयाबाहेर आहेत. या कार्यालयात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक होणार होती. या बैठकीदरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती मिळत आहेत.

दरम्यान, शिवसेनेत सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे विधानभवनातील हे शिवसेनेचं विधिमंडळ कार्यालय सील करण्यात आले आहे का, कार्यालय नेमकं कोणाकडून सील करण्यात आले, असे अनेक सवाल यानंतर उपस्थितीत केले जात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून हे पक्ष कार्यालय बंद करण्यात यावे, असे पत्र आल्यानंतर हे कार्यालय बंद केल्याची माहिती मिळतेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.