Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन

113
Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन
Maharashtra Asembly 2024 : सदा सरवणकरांना मिळाली ऑफर? निवडणुकीतून माघार घेण्यासाठी दिले ‘हे’ आश्वासन

राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान माहीम मतदारसंघात (Mahim Constituency) शिवसेनेचे विद्यमान आमदार सदा सरवणकर (Sada Saravankar), उबाठा पक्षाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) आणि मनसेकडून राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे (Amit Thackeray) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित ठाकरे यांच्यासाठी सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी, अशी मागणी होत आहे. यासाठी महायुतीकडून सरवणकरांना मोठी ऑफर देण्यात आली आहे. (Maharashtra Asembly 2024)

अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून त्यांनी माहीममधून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे माहीम मतदारसंघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, सरवणकर यांना महायुतीकडून विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदा सरवणकर विधानपरिषदसाठी माघार घेतील का? हे येत्या ४ दिवसांत स्पष्ट होईल. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाला बिनशर्त दिलेला पाठिंबा पाहता, अमित ठाकरेंना पाठिंबा देण्यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांनी माघार घ्यावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.

(हेही वाचा – Hindus in Bangladesh : बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचारांची मालिका सुरुच; इस्कॉनचे सचिव चिन्मय दास यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल)

अमित ठाकरेंसाठी विजयाचा मार्ग कठीण?

माहीत मतदारसंघात उबाठा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी महेश सावंत, शिवसनेचे सदा सरवणकर, तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आमदार सदा सरवणकर यांनी निवडणुकीतून माघार न घेतल्यास अमित ठाकरे यांचा विधानसभेत जाण्याचा मार्ग कठीण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.