महाराष्ट्र विधानसभा निवडणूकसाठी (Maharashtra Assembly 2024) उमेदवारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे दाखल झाली असून मालमत्तेचा तपशीलही समोर आला आहे. त्यामुळे घाटकोपर पूर्व मतदारसंघातून भाजपाचे पराग शहा (Parag Shah) हे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार असल्याची माहिती आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची संपत्ती 3383.06 कोटी रुपये आहे. (Maharashtra Assembly 2024)
आश्चर्यकारक बाब म्हणजे भाजपाचे उमेदवार पराग शहा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांत 575 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची संपत्ती 550.62 कोटी रुपये होती. प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांनी त्यांच्याकडे 1 कोटी 81 लाख रुपये आणि पत्नीकडे 1.30 कोटी रुपये रोख असल्याची माहिती दिली आहे. तर पराग शाह यांनी 7783981 रुपयांची गुंतवणूक केली असून त्यांच्या पत्नीच्या नावावर 8.65 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक आहे.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात पराग शाह यांच्यावर 43.29 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज असल्याचे लिहिले आहे. त्याचबरोबर त्यांच्या पत्नीवर 10.85 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज आहे. पराग शहा यांच्याकडे एकही कार नाही, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.
(हेही वाचा – Diwali च्या फटाक्यांनी प्रदूषण होते अशी ओरड करणारे ढोंगी पर्यावरणप्रेमी अंनिसवाले वर्षभर कुठे असतात?)
कोण आहे पराग शहा?
पराग शहा हे घाटकोपर मतदारसंघातून (Ghatkopar Constituency) भाजपचे विद्यमान आमदार आहेत. शाह हे रिअल इस्टेट डेव्हलपर (Real estate developer) आहेत आणि त्यांचे प्रकल्प गुजरात आणि चेन्नईमध्ये पसरलेले आहेत. 2017 च्या बीएमसी निवडणुकीत त्यांनी 690 कोटी रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. त्यांची पत्नी मानसी यांच्याकडेही कोट्यवधींची संपत्ती असून त्यात व्यावसायिक, निवासी आणि कृषी मालमत्तांचा समावेश आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले ते सर्वात श्रीमंत उमेदवार देखील होते. यासोबतच त्यांच्याकडे 422 कोटी रुपयांची जंगम आणि 78 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात उघड झाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community