पहिल्यांदा एखादा मंत्री जेलमध्ये आहे, तरीही त्यांचा राजीनामा घेतला जात नाही, हे असे का घडत आहे? मलिक यांच्यावर कुख्यात गुंड दाऊदशी व्यवहार केल्याचा आरोप आहे. मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी जे जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत त्यांच्याकडून कवडीमोल दरात जमीन घ्यायची जी तिसऱ्याच्या मालकीची होती, जमीन मालकाला एक पैसा देत नाही आणि त्या जमिनीचा कब्जा मिळवून दिला, म्हणून दाऊदची बहीण हसीना पारकर हिला ५५ लाख रुपये दिले, त्यानंतर मुंबईत ज्या कारवाया झाल्या त्याला तो पैसा वापरण्यात आला, हे दाऊद समर्पित सरकार आले. दाऊद शरण हे सरकार आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.
कुणाच्या दबावाखाली मलिकांना वाचवले जातेय?
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून सभागृहात गोंधळ माजल्यामुळे सभागृह दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. त्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, संजय राठोड जेलमध्ये गेले नाही, तरी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा घेतला, इथे तर मलिक जेलमध्ये आहेत, तरीही त्यांचा राजीनामा घेत नाही. कुणाच्या दबावाखाली मलिक यांना वाचवले जात आहे, म्हणून आम्ही सरकारला जाब विचारणारच, मात्र सरकार यातून पळ काढत आहे. जी शिवसेना दाऊदच्या नावाने आक्रमक दिसायचे, आज मंत्री दाऊदच्या व्यवहारात आहे, स्पष्ट दिसत आहे तरीही त्याकडे सरकार दुर्लक्ष करत आहे. राज्यपाल अभिभाषण करण्यासाठी आले होते, तेव्हा सदस्यांच्या भावना होत्या कि जे सरकार दाऊदचे समर्थक आहे, त्यांचे भाषण का करता, ही भावना सदस्यांची होती. तीनवेळा राज्यपालांनी त्यांना मला राष्ट्रगीत घेऊ द्या, अशी विनंती केली होती, मात्र तरीही सत्ताधाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकले नाही, असेही फडणवीस म्हणाले.
(हेही वाचा राज्यपाल अभिभाषण न करता परतले, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपाल ‘लक्ष्य’)
Join Our WhatsApp Community