शेलार म्हणाले, “… आणि महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण झालं”

125

विधानसभा उपाध्य़क्ष, सभापती, उपसभापती यांनी १२ आमदारांचे निलंबन मागे घेतले याबाबत आभार व्यक्त करतो. मात्र, राज्य सरकारने आमचे निलंबन रद्द केले नाही, पण आम्ही आमचा अधिकार मिळवला, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परीषदेत म्हटले आहे. यावेळी पुढे ते असेही म्हणाले की, भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन मागे घेतल्याबद्दल आभार पण त्यात विनम्रतेने स्पष्टता आणू इच्छितो की, तुम्ही अधिकार परत दिले हे खरे नाही तर ते अधिकार हे आम्ही न्यायिक लढाईत मिळवले हे सत्य आहे. सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा या प्रकरणात महाराष्ट्र विधिमंडळाला संधी दिली तेव्हा विधिमंडळाने बाजू मांडली नाही. तुमची वेळ गेली आणि तुम्ही संधी गमावली आणि मागणीही चुकली अशी प्रतिक्रिया शेलारांनी दिली. या संपूर्ण आमदार निलंबन प्रकरणात तानाशाही हरली लोकशाही जिंकली आणि महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण झाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेने केलेला ठराव हा अवैध, तर्कहीन आणि असंविधानिक असल्याचे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे. त्यामुळे विधिमंडलाच्या आरोपावर तेवढीच विन्रमतेने स्पष्टता आणण्याची आवश्यकता असल्याचे आशिष शेलार म्हणाले. विधिमंडळाला सर्वोच्च न्यायालयाने नोटीस दिली होती आणि आपली बाजू मांडा असे सांगितल होते. परंतू ते गेले नव्हते. त्यांनी आम्ही सर्वोच्च न्यायलयासमोरं जाणार नाही असे म्हटले होते. एकीकडे न्यायालयात जायचं नाही आणि दुसरीकडे राष्ट्रपतीकडे जाऊन मागणी करायची हे योग्य नसल्याचे शेलार यावेळी म्हणाले.

(हेही वाचा- “राहुल असेपर्यंत काँग्रेसचा ‘राहुकाल’ सुरुच राहणार”)

विधिमंडळ कार्यकाळात देखील आम्हाला त्यांनी नोटीस दिली नाही. त्यामुळे आम्हाला न्यायालयात जावे लागले होते. जर त्याचवेळी आम्हाला संधी दिली असती तर हे झालं नसते. शिवाय न्यायालयाने यांना बाजू मांडायला सांगून देखील त्यांनी बाजू मांडली नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात विधानमंडळच्या कामात हस्तक्षेप करत आहे, हे म्हणणे योग्य नाही, असे आशिष शेलार म्हणाले. विधानपरिषदेचे सभापती, उपाध्यक्ष यांनी राष्ट्रपती यांना भेटणे याबाबत मला काही भाष्य करावेसे वाटत नाही. परंतु रेफरन्स टू लार्जर बेंच या महाराष्ट्र विधिमंडळाच्या मुद्द्यावर स्पष्टता आणणे आवश्यक असल्याचे शेलार म्हणालेत. या मांडणीमुळे उडणारा धुरळा आणि धूर हा उडता कामा नये यासाठी आम्हाला आमची बाजू मांडायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.