राज्यातील राज्यसभा निवडणुकांच्या निकालानंतर आता 20 जून रोजी होणा-या विधान परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आता मावळली आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता विधान परिषदेतसुद्धा महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा जंगी सामना पहायला मिळणार आहे.
10 जागांसाठी 11 उमेदवार रिंगणात
ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच विरोधी पक्ष भाजप यांच्याकडून प्रयत्न करण्यात येत होते. पण काँग्रेसने आपला दुसरा उमेदवार मागे न घेतल्यामुळे विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आता एकूण 11 उमेदवार रिंगणात उभे ठाकणार आहेत. यामध्ये महाविकास आघाडी आपले सर्व उमेदवार निवडून आणणार का, की राज्यसभेप्रमाणेच त्यांना भाजपकडून पराभव पत्करावा लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(हेही वाचाः आमदारांना घोडा म्हणणं, हा गाढवपणा! भाजपच्या अनिल बोडेंचा राऊतांवर हल्लाबोल)
कोणाकडून कोणाला उमेदवारी?
महाविकास आघाडी
शिवसेना-2
सचिन अहिर
आमशआ पाडवी
राष्ट्रवादी काँग्रेस-2
रामराजे निंबाळकर
एकनाथ खडसे
काँग्रेस-2
भाई जगताप
चंद्रकांत हंडोरे
भाजप-5
प्रवीण दरेकर
प्रसाद लाड
राम शिंदे
उमा खापरे
श्रीकांत भारतीय
(हेही वाचाः राणा फेसबूक लाईव्हमध्ये हनुमान चालिसा विसरले आणि…)
खोतांचा उमेदवारी अर्ज मागे
भाजपने पाठिंबा दिलेले उमेदवार सदाभाऊ खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज भरलेल्या शिवाजीराव गर्जे यांनीही आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
Join Our WhatsApp Community