महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक (Maharashtra Assembly Election) ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात होवू शकते. यासाठी निवडणूक आयोगाने नव मतदारांच्या नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली होती. राज्यातून जवळपास 16.9 लाख नव मतदारांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवले आहे. त्यामुळे 16.9 लाख मतदारांची भर पडली आहे.
(हेही वाचा –LPG Gas Cylinder Price : गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ; नवे दर जाहीर)
नाव नोंदवण्यामध्ये महिलांची संख्या ही मोठी आहे. यामध्ये पुरूषांना मागे सोडले आहे. नव मतदारांमध्ये दहा लाख महिलांनी आपली नोंदणी केली आहे. त्या तुलनेत पुरूषांची नोंदणी ही कमी झाली आहे. 6.8 लाख पुरूषांनी नव्याने नोंदणी केली आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा –Mumbai Alibaug Ferry Boat : तीन महिने बंद राहिलेली मांडवा – गेटवे जलवाहतूक पुन्हा सुरू)
महाराष्ट्रात जवळपास 9 कोटी पन्नास लाख मतदार विधानसभेसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 18 ते 19 वयोगटातील नव मतदारांची संख्या अगदीच नगण्य आहे. एकूण मतदारांच्या दोन टक्केच मतदार हे 18 ते 19 वयोगटातील आहेत. एकूण 4.9 पुरूष मतदार आहेत. तर 4.6 कोटी महिला मतदार आहेत. तर 5 हजार 944 मतदार हे तृतियपंथी मतदार आहे. नव मतदारांमध्ये 164 तृतियपंथी यांनी नोंद केली आहे. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community