Assembly Election : महायुतीचे जागावाटप जवळपास स्पष्ट; मात्र मविआचा तिढा काही सुटेना

109
Assembly Election : महायुतीचे जागावाटप जवळपास स्पष्ट; मात्र मविआचा तिढा काही सुटेना
Assembly Election : महायुतीचे जागावाटप जवळपास स्पष्ट; मात्र मविआचा तिढा काही सुटेना

केंद्रीय निवडणूक आयोगाने दि. २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला. दरम्यान दि. २० ऑक्टोबरला भाजपाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून महायुतीचे जागा वाटप जवळपास स्पष्ट झाल्याचे संकेत दिले. त्याचवेळी दुसरीकडे मविआचा जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटलेला दिसत नाही. (Assembly Election)

महायुतीत भाजपा आणि महाविकास आघाडीत काँग्रेस हे मोठे राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यांच्या जागा अधिक असल्याने तितका तिढा मोठा आहे. तरीही महायुतीतील भाजपाने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यावरून महायुतीतील मोठ्या पक्षाने पहिली यादी जाहीर केल्यामुळे साहजिकच छोटे घटक पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्याही जागा वाटप निश्चित झाल्या असणारच. त्यामुळे महायुतीतील जागा वाटपाचा तिढा सुटलेला असल्याचे चित्र आहे. (Assembly Election)

काँग्रेसची यादी रखडल्याने आघाडी पिछाडीवर 

दुसऱ्या बाजूला मविआत काँग्रेस पक्ष मोठा आहे. काँग्रेस सर्वाधिक जागा लढणार आहे. मात्र याच काँग्रेससोबत उबाठा गटाचे मतभेद सुरु आहेत. महाविकास आघाडीत उबाठा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्या जागा वाटपात कोणतेही मतभेद नाहीत, मात्र उबाठाचे काँग्रेससोबत विदर्भातील जागांच्या संदर्भात मतभेद झाले असून ते टोकाला पोहचले आहेत. यामुळे मविआमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा रीतीने एका बाजूला महायुतीतील मोठा पक्ष भाजपाने पहिली मोठी यादी जाहीर करून महायुतीत सगळे आलबेल असल्याचे दाखवून दिले आहे. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाच्याच जागांवरून वाद असल्याने आघाडीतील उमेदवारांची मोठी यादी रखडली आहे. (Assembly Election)

भाजपाच्या पहिल्या यादीमुळे आघाडी अस्वस्थ

आता दोन दिवसात महायुतीतील सर्व जागांवरील उमेदवार जाहीर होतील, तेव्हा मात्र मविआच्या पक्षांची तारांबळ उडणार आहे. अशा वेळी एखाद्या जागेवर ऐनवेळी उमेदवार जाहीर केल्यास नाराज नेत्यांच्या मनधरणीसाठी मविआला कष्ट करावे लागतील. त्यात मविआतील छोटे पक्ष असणाऱ्या उबाठा, राष्ट्रवादी शरद पवार गटाला ऐनवेळी मित्रपक्षाच्या मर्जीनुसार उमेदवार बदलावा लागला तर पक्षातील नाराज नेत्यांची संख्या आणखीनच वाढू शकते. भाजपाने उमेदवारांची पहिली मोठी यादी जाहीर करून एकप्रकारे मविआला अस्वस्थ केले आहे, हे निश्चित!! (Assembly Election)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.