Maharashtra Assembly Election 2024 : माहीममध्ये गुरु शिष्यामध्येच लढाई

329
Mahim Assembly Fight : शेलारांच्या भूमिकेशी स्थानिक भाजपा नेते सहमत
  • सचिन धानजी, मुंबई

विधानसभा निवडणुकीत कुणाचा मुलगा तर कुणाचा पुतण्या तर कुणाची वहिनी असे कुणाचे सगेसोयरे एकमेकांसमोर ठाकले असून समोर कोण लढत आहे, यापेक्षा जिंकायचे आहे याच हेतूने प्रत्येक जण निवडणुकीला सामोरे जात आहेत. त्यातच आता राजकीय गुरु शिष्यही आमने सामने उभे ठाकले आहेत. माहीम विधानसभा मतदारसंघात अशाच एका गुरु शिष्याची लढाई होणार आहे. हे गुरु शिष्य आता विरुद्ध पक्षांमधून निवडणूक लढवत असून यामध्ये गुरु की शिष्य यशवंत ठरतात की दोघांच्या स्पर्धेत तिसऱ्या कुणाचे इंजिन धावेल याबाबत तर्क लढवले जात आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

सदा सरवणकर हे शाखाप्रमुख 

माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्यावतीने सदा सरवणकर, मनसेचे अमित राज ठाकरे आणि उबाठा शिवसेनेचे महेश सावंत यांच्या तिरंगी लढत आहे. परंतु या निवडणुकीत दोन्ही शिवसेनेचे उमेदवारांचे नाते हे गुरु शिष्याचे आहे. शिवसेनेचे सदा सरवणकर हे महेश सावंत यांचे राजकीय गुरु असून सदा सरवणकर यांच्या तालमीतच महेश सावंत हा तयार झालेला आहे. दादरमध्ये मोतीराम तांडेल हे नगरसेवक असताना सदा सरवणकर हे शाखाप्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यानंतर सदा सरवणकर हे नगरसेवक बनल्यानंतर सदा सरवणकर यांचा वारसदार म्हणून महेश सावंत हे शाखाप्रमुख बनले होते. त्यानंतर कायमच महेश सावंत हे सदा सरवणकर यांच्यासोबतच राहिले होते. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Koregaon मतदारसंघात शशिकांत शिंदेंना महेश शिंदेंचे तगडे आव्हान)

निवडणुकीत दोघांचा पराभव 

सन २००९च्या निवडणुकीत शिवसेनेने सदा सरवणकर यांचा पत्ता कापून आदेश बांदेकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे तत्कालिन काँग्रेस नेते नारायण राणे यांच्या पुढाकाराने सदा सरवणकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांना उमेदवारी दिली. त्यावेळी सदा सरवणकर यांच्यासोबत महेश सावंत, अजित कदम या शाखाप्रमुखांसह इतर पदाधिकारीही गेले होते. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान १९४ महेश सावंत यांना प्रभादेवी आणि समाधान सरवणकर यांना माहिममधील विद्यमान १९०मधून उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत दोघांचा पराभव झाला  होता आणि दोन्ही मतदार संघात मनसेचे अनुक्रमे संतोष धुरी आणि विरेंद्र तांडेल यांचा विजय झाला होता. (Maharashtra Assembly Election 2024)

पुन्हा एकदा शिवसेना भवनच्या अंगणात…

यानंतर  निवडणुकीनंतर सदा सरवणकर हे पुन्हा शिवसेनेत परतले आणि ते विभागप्रमुख बनले, त्याबरोबर महेश सावंत आणि अजित कदम यांच्यावर पुढे जुनीच जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यानंतर सन २०१४च्या विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर हे शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले आणि पुन्हा एकदा शिवसेना भवनच्या अंगणात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला गेला. परंतु त्यानंतर सन २०१७मध्ये झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक १९४मधून समाधान सरवणकर यांना उमेदवारी दिल्यामुळे महेश सावंत यांनी बंडखोरी करत सदा सरवणकर यांच्या विरोधात आव्हान निर्माण केले, पंरतु त्यात समाधान हा विजयी होत महेश सावंत यांचा पराभव केला. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Mahim Constituency : सदा सरवणकर यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची)

सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचे गुरु शिष्याचे नाते 

या निवडणुकीपासूनच सदा सरवणकर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने दुश्मनी सुरु झाली आणि  जुलै २०२२मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांसोबत सदा सरवणकर हे गेल्यामुळे त्यांना शह देणाऱ्या पदाधिकाऱ्याचा शोध घेत उबाठा शिवसेनेने दादरमधील माजी शाखाप्रमुख महेश सावंत यांच्यावर जबाबदारी सोपवली आणि महेश सावंत यांनी जीवाची बाजी लावून पक्ष वाढवण्यासाठी प्रयत्न केला. सदा सरवणकर आणि महेश सावंत यांचे गुरु शिष्याचे नाते असले तरी या गुरु शिष्यांना एकमेकांचे कमकुवत दुवे माहीत आहे आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

महेश सावंत कसा बनला शिवसैनिक

सदा सरवणकर हे शाखाप्रमुख असताना जिप्सी जिपमधून फिरायचे. अशाप्रकारे एकदा जिपमधून नागु सयाजीची वाडीतून जात असताना तिथे क्रिकेट खेळत असलेल्या मुलांचा चेंडून या गाडी खाली गेला चिरडला. त्यामुळे आपला चेंडू गाडीने चिरडल्याने संतप्त झाल्याने एक तरुण हातात स्टंप घेऊन सरवणकर यांच्या घरी धावून गेला होता. पण तिथे पोहोचल्यानंतर ते शिवसेनेचे शाखाप्रमुख असल्याचे समजताच त्यांनी माफी मागून  निघून गेला. हा तरुण महेश सावंत होता. पुढे महेश सावंत याला शिवसैनिक बनले गेले आणि शाखांमध्ये नियमित येवू लागले आणि त्यांच्यावर मग गटप्रमुखांची जबाबदारी सोपवली गेली. पण सदा सरवणकर नगरसेवक बनल्यानंतर त्या रिक्त जागेवर शाखाप्रमुख म्हणून आक्रमक चेहरा म्हणून सदा सरवणकर यांनी त्याची वर्णी लावली होती. त्यामुळे सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाची छाप ही महेश सावंत यांच्यावर असून त्यांच्या तालमीतच वाढल्याने आता त्यांचे आव्हान समोर आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

त्याचे खापर जोशींच्या नावावर फोडण्याचा प्रयत्न

सन २००९मध्ये विधानसभा निवडणुकीत सदा सरवणकर यांचा पत्ता कापला गेला. मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी सदा तुला यावर्षी थाबावे लागेल, असे सांगितले. तिथून सदा सरवणकर हे गाडीतून घरी परत असताना शिवसेनेच्या एका मोठ्या नेत्याने सदा सरवणकर यांना फोन करून तुमचे तिकीट मनोहर जोशी यांनी कापले अशी माहिती दिली. त्यामुळे हे सर्व जण दादरच्या ओशियाना जवळ जाऊन त्यांनी जोशी यांच्या घराबाहेरील कुंड्या फोडल्या होत्या. सदा सरवणकर यांचे तिकीट कापण्याचा कारस्थान मातोश्रीवर रचले गेले असताना त्याचे खापर मनोहर जोशी यांच्या नावावर फोडण्याचा प्रयत्न केला होता, असेही काही किस्से जुन्या शिवसैनिकांकडून सांगितले जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.