महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना उबाठा गटाची (Shivsena UBT Group Candidate List) तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये उबाठा गटाच्या तीन उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
उबाठा गटाची ३ री यादी जाहीर केली असून, यामध्ये वर्सोवा, घाटकोपर, विलेपार्ले या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे.
कोण आहेत तिसऱ्या यादीतील उमेदवार?
१) वर्सोवा – हरुन खान
२) घाटकोपर पश्चिम – संजय भालेराव
३) विलेपार्ले – संदिप नाईक
माननीय शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या आदेशाने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ करिता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणखी तीन अधिकृत उमेदवारांची यादी जाहिर करण्यात आली आहे.
१६४ वर्सोवा – हरुन खान
१६९ घाटकोपर पश्चिम – संजय…— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 26, 2024
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित ठाकरेंना समर्थन देण्यासाठी महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार)
दरम्यान, शिवसेना उबाठा गटाने विधानसभा निवडणुकीसाठी काही वेळापूर्वीच दुसरी तिसरी जाहीर केली आहे. उबाठा गटाच्या पहिल्या यादीत ६५ उमेदवार होते. त्यानंतर दुसरी यादी जारी करण्यात आली आहे. या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे. त्यानंतर आणखी ३ उमेदवारांची नाव जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीत शिवसेना उबाठा गटाने भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव (MLA Yamini Jadhav) यांच्याविरोधात मनोज जामसुतकर यांच्यात लढत होणार आहे. वडाळ्यातून माजी महापौर श्रद्धा जाधव, तर शिवडीतून विधिमंडळ गटनेते अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच उबाठा गटात प्रवेश केलेल्या अनुराधा नागवडे यांना श्रीगोंद्यातून उमेदवारी देण्यात आली आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community