Maharashtra Assembly Election 2024: ‘हे’ ४५ मोठे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी

58
Maharashtra Assembly Election 2024: 'हे' ४५ मोठे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी
Maharashtra Assembly Election 2024: 'हे' ४५ मोठे नेते आज भरणार उमेदवारी अर्ज; पाहा संपूर्ण यादी

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election 2024) रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीच्या तीनही घटकपक्षांकडून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तीनही पक्षांनी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपकडून 99, शिंदे गटाकडून 45 तर अजित पवार गटाकडून 38 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. महायुती पाठोपाठ आता महाविकास आघाडीतही घडामोडींना वेग आला आहे. अनेक जणांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एबी फॉर्म देण्यात आले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा-Assembly Election 2024 : अमित ठाकरेंसाठी वरळी पॅटर्न की थेट लढतच?)

अनेक मोठे नेते आज (२४ ऑक्टो.) समर्थकांसहीत महसूल कार्यालयांमध्ये हजेरी लावणार आहेत. अगदी मुंबईपासून ते विदर्भ आणि तळ कोकणापर्यंत अनेक उमेदवार आज अर्ज दाखल करणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे स्वत: उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

अर्ज भरणाऱ्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे- (Maharashtra Assembly Election 2024)
कांदिवली पूर्व – अतुल भातखळकर
कळवा-मुंब्रा – जितेंद्र आव्हाड
इस्लामपूर – जयंत पाटील
वरळी – आदित्य ठाकरे
ठाणे शहर – अविनाश जाधव
ठाणे शहर – राजन विचारे
जुन्नर – अतुल बेनके
बीड – धनंजय मुंडे
शिरूर – अशोक पवार
येवला – छगन भुजबळ
कोथरुड – चंद्रकांत पाटील
इंदापूर – हर्षवर्धन पाटील
मावळ – सुनील शेळके
भोर- संग्राम थोपटे
आंबेगाव – दिलीप वळसे पाटील
कागल – समरजीत घाटगे
सांगली – सुधीर गाडगीळ
कडेगाव – संग्राम देशमुख
खानापूर- सुहास बाबर
तासगाव – कवठेमहांकाळ- रोहित पाटील
जत – विक्रम सावंत
दक्षिण सोलापूर – सोमनाथ वैद्य
माढा – रणजीत शिंदे
लातूर – विनोद खटके
तिवसा – यशोमती ठाकुर
चिमूर – बंटी भांगडीया
हिंगणघाट – समीर कुणावर
दर्यापूर – अभिजित अडसूळ
धामणगाव रेल्वे – प्रताप अडसड
शिर्डी – राधाकृष्ण विखे पाटील

(हेही वाचा-MNS ची तिसरी यादी जाहीर, १३ उमेदवारांच्या नावाची घोषणा)

याशिवाय धनराज महाले (दिंडोरी), संग्राम जगताप (अहमदनगर), राणी लंके (पारनेर), मिहीर कोटेचा (भांडुप पश्चिम), मंगलप्रभाद लोढा (मलबार हील), कालीदास कोळंबकर (अँटॉप हील), किरण सामंत (राजापूर), राजन साळवी (उद्धव ठाकरे शिवसेना ) (राजापूर) हे सुद्धा आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दापोलीमधून शिंदेंच्या शिवसेनेचे योगेश कदम, गुहागरमधून उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे भास्कर जाधव, चिपळूणमधून शरद पवारांच्या पक्षाचे प्रशांत यादव उमेदवारी अर्ज आज दाखल करतील. राहुरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले भरणार उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसेच अकोलेचे डॉ. किरण लहामटेही आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.