महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे (Maharashtra Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर करत आहेत. गुरुवार २५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी (MNS Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मनसेच्या पाच उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
मनसेने ४ थी यादी जाहीर केली असून, यामध्ये कसबा पेठ, चिखली, कोल्हापूर उत्तर, केज, कलिना या विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर मतमोजणी होणार आहे.
कोण आहेत चौथ्या यादीतील उमेदवार?
१. गणेश भोकरे – कसबा पेठ
२. गणेश बरबडे – चिखली
३. अभिजीत राऊत – कोल्हापूर उत्तर
४. रमेश गालफाडे – केज
५. संदीप हुटगी – कलीना
आगामी विधानसभा २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी , महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची चौथी यादी खालीलप्रमाणे…. pic.twitter.com/LP8hBG0JJo
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) October 25, 2024
(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकरांच्या कार्याचा प्रचार-प्रसार करणाऱ्या Manjiri Marathe यांचा ‘समाजभूषण पुरस्कारा’ने गौरव)
अमित ठाकरे (Amit Thackeray) यांनी विधानसभा निवडणुकांपूर्वीच लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. अमित ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत ही इच्छा मांडली होती. त्यानुसार, राज ठाकरे स्वतः अमित ठाकरे यांच्या मतदारसंघाची चाचपणी करत होते. यापूर्वी अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुप, मागठाणे आणि माहिम या तीन मतदारसंघांची निवड करण्यात आली होती. मात्र आता अमित ठाकरे हे माहीममधून विधानसभा (Mahim Assembly) निवडणूक लढवणार आहेत.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community