Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण; फक्त मोजक्याच जागांचा ‘तिढा’ शिल्लक

141
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण; फक्त मोजक्याच जागांचा तिढा शिल्लक
Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील जागावाटप जवळपास पूर्ण; फक्त मोजक्याच जागांचा तिढा शिल्लक

विधानसभा निवडणूकीचा (Vidhan Sabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वत राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. अशातच महायुतीमध्ये जागावाटपाचा पेच कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, शुक्रवारी (19 ऑक्टोबर) दिल्लीत झालेल्या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा (Mahayuti Seat Sharing) मुद्दा निकाली लागल्याचे म्हटले जात आहे. आता मोजक्याच जागांचा प्रश्न असून लवकरच त्या जागांचेही वाटप होईल, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली रात्री उशिरापर्यंत बैठक चालू होती.  (Maharashtra Assembly Election 2024)

रात्री अडीच तास चालली बैठक 

महाराष्ट्र विधानसभेचा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे दिल्लीमध्ये गेले होते. या तिन्ही नेत्यांची अमित शाहा यांच्यासोबत रात्री उशिरा एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीतील जागावाटपावर चर्चा झाली. ज्या जागांवर वाद चालू होता, तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये महायुतीला बऱ्यापैकी यश आल्याचे म्हटले जात आहे. अमित शाह यांच्या निवासस्थानी पार पडलेली ही बैठक एकूण अडीच तास चालली. जागावाटपाचा तिढा अमित शाह यांच्या समक्ष सोडवण्यात आला असून आता फक्त काहीच जागांचा प्रश्न असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  

(हेही वाचा – हिंदूंच्या भावना दुखावणाऱ्या Maulana Sajid Rashidi वर गुन्हा दाखल करण्याची मागणी)

कोणत्या पक्षाला किती जागा हव्यात?

महायुतीचे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस हे तिन्ही पक्ष जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपाला 288 जागांपैकी कमीत कमी 150 जागा हव्या आहेत. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 87 ते 90 जागा हव्या आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला कमीत कमी 60 जागा हव्या आहेत. असे असताना जागावाटपाची ही चर्चा सध्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.