Maharashtra Assembly Election 2024 : रासपची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

60
Maharashtra Assembly Election 2024 : रासपची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Maharashtra Assembly Election 2024 : रासपची ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाची (National Samaj Party) पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, महायुतीपासून (Mahayuti) वेगळया झालेल्या रासपने विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Elections 2024) शनिवारी २६ ऑक्टोबर रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यामध्ये ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. रासपच्या यादीत गंगाखेड मतदारसंघातून डॉ. रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांच्यासह ६५ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एकाच टप्प्यात मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)

उमेदवारांची नावे –

गंगाखेड – आ. डॉ. रत्नाकर माणिकराव गुट्टे, अहमदपूर – आ. बब्रुवान खंदाडे, भोकर – साहेबराव बाबा गोरटकर, कळंब धाराशिव – श्रीहरी वसंत माळी, परांडा – डॉ. राहुल भीमराव घुले, परभणी – सावित्री सतीश महामुनी चकोर, मुखेड – विजयकुमार भगवानराव पेठकर, हदगाव हिमायतनगर अॅड. संतोष उत्तमराव टीकोरे, नायगाव – हनुमंतराव मारोतराव वनाळेकर, बारामती- संदीप मारुती चोपडे, अक्कलकोट – सुनील शिवाजी बंडगर, राहुरी – नानासाहेब पंढरीनाथ जुधारे, अंबरनाथ – रुपेश थोरात, निलंगा – नागनाथ बोडके, इंदापूर – तानाजी उत्तम शिंगाडे, देगलूर – श्याम बाबुराव निलंगेकर, पैठण – प्रकाश उत्तमराव दिलवाले, वैजापूर गंगापूर – बाबासाहेब कचरू राशिनकर, कराड उत्तर – सोमनाथ रमेश चव्हाण, पुरंदर – संजय शहाजी निगडे, भोर – रामचंद्र भगवान जानकर, खानापूर आटपाडी- उमाजी मोहन चव्हाण, कोल्हापूर दक्षिण – विशाल केरू सरगर, पन्हाळा शाहूवाडी – अभिषेक सुरेश पाटील, इचलकरंजी- प्रा. सचिन किरण बेलेकर, सातारा – शिवाजी भगवान माने, आंबेगाव – योगेश पांडुरंग धरम, कोथरूड – सोनाली उमेश ससाणे, कसबा पेठ – शैलेश रमेश काची, वडगाव शेरी – सतीश इंद्रजीत पाण्डेय, मागाठाणे – जिवाजी लेंगरे, जोगेश्वरी पूर्व – विजय पतिराम यादव, कांदिवली – ओमप्रकाश सोनार, दिडोशी – राकेश लालमनी यादव, नालासोपारा – नरसिंह रमेश आदावळे, वसई – हरिशंकर शेषनारायण जयस्वाल, सांगोला – सोमा उर्फ आबा गुलाब मोटे, वर्सोवा – मेहक चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.