महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) उमेदवारी अर्ज (Nomination Form) दाखल करण्याचा मंगळवार २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस आहे. परंतु महाविकास आघाडी आणि महायुतीला अद्याप सर्व २८८ जागांवर उमेदवार देता आलेले नाहीत. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीत (Mahayuti) सामील आहे. तर काँग्रेस, शिवसेना उबाठा गट आणि शरदचंद्र पवार गटाची याशिवाय अन्य लहान पक्षांचा महाविकास आघाडीत (MahaVikas Aghadi) समावेश आहे. मात्र निवडणुकीच्या तोंडवर ही महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरूच आहे. (Maharashtra Assembly Election 2024)
महायुतीत ९ जागांवर पेच
महायुतीतील मित्रपक्ष भाजप आणि शिवसेनेने सोमवारी अनुक्रमे 25 आणि 13 उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. तर महायुतीच्या इतर मित्रपक्षांनी ६ जागांवर उमेदवार जाहीर केले. महायुतीने आतापर्यंत २८८ पैकी २७९ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. यामध्ये भाजपाने १४६, शिवसेना ७८, राष्ट्रवादीने ४९ आणि इतर मित्रपक्षांनी ६ जागांवर उमेदवार दिले आहेत. म्हणजेच महायुतीने अजून ९ जागांवर उमेदवार जाहीर केलेले नाहीत.
(हेही वाचा – Kerala Temple Accident : केरळच्या मंदिरात फटाक्यांना भीषण आग; १५० भाविक जखमी)
महाविकास आघाडीत २१ जागांवर संभ्रम
महाविकास आघाडीतील शरदचंद्र पवार (Sharad Chandra Pawar) गटाने सोमवारी 6 उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.आतापर्यंत काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने अनुक्रमे १०२ आणि ८४ जागांवर आपले उमेदवार आधीच जाहीर केले आहेत, तर शरदचंद्र पवार गटाने ८२ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. अशा प्रकारे, महाविकस आघाडीने आतापर्यंत २६५ जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. अजून २१ जागांसाठी उमेदवार जाहीर करायचे आहेत. नागपूरच्या काटोल जागेवर शरदचंद्र पवार गटाने उमेदवार बदलला आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना याआधी येथून तिकीट मिळाले होते, मात्र शरदचंद्र गटाने सोमवारी त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा सलील देशमुख यांना काटोलमधून उमेदवारी दिली आहे.
(हेही वाचा – आत्महत्येचा इशारा देणारे पालघरचे विद्यमान आमदार Srinivas Vanga ‘नॉट रिचेबल’)
दरम्यान, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून सर्व २८८ जागांसाठी २३ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख २० नोव्हेंबर आणि मतमोजणीची तारीख २३ नोव्हेंबर निश्चित केली आहे. यासह राज्यात आदर्श आचारसंहिता देखील लागू करण्यात आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अद्याप निश्चित न झालेल्या जागांबाबत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community