Assembly Election मध्ये उमेदवाराचे नाव ‘सेम टू सेम’; नशीब आजमावण्याच्या नादात कुणाचा होणार ‘गेम’

105
Assembly Election मध्ये उमेदवाराचे नाव 'सेम टू सेम'; नशीब आजमावण्याच्या नादात कुणाचा होणार 'गेम'
Assembly Election मध्ये उमेदवाराचे नाव 'सेम टू सेम'; नशीब आजमावण्याच्या नादात कुणाचा होणार 'गेम'

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ८ हजारांहून अधिक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केली आहेत. त्यात ७ हजार ९९४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहे. दि. २० नोव्हेंबरला होणाऱ्या या निवडणुकीत विजयाचा रथ खेचून आणण्यासाठी सर्वच उमेदवारांकडून अथक परिश्रम केले जात आहे. मात्र काही विधानसभा मतदारसंघात एकाच नावाचे एकापेक्षा जास्त उमेदवार आपले नशीब आजमावत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे काही ठिकाणी रणनितीचा भाग म्हणून तत्सम उमेदवार सारख्या नावाचे उभे केले जातात. यामुळे प्रस्थापित उमेदवारांची अडचण होत असते. (Assembly Election)

‘या’ मतदारसंघात सारख्या नावाचे उमेदवार

पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाच्या अश्विनी कदन रिगणात असून अश्विनी नावाच्या इतर तीन उमेदवार रिंगणात आहेत.त्यात ही अश्विनी कदम नावाच्या दोन उमेदवार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून रोहिणी एकनाथ खडसे उभ्या आहेत. तिथेच रोहिणी पंडित खडसे आणि रोहिणी गोकुळ खडसे अशा दोन उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

( हेही वाचा : Assembly Election मध्ये ४७ जागांवर शिवसेना विरुद्ध शिवसेना उबाठा गट भिडणार

तसेच सांगली जिल्ह्यातील तासगाव- कवठेमहाकाळ विधानसभेत राष्ट्रवादीचे संजय काका पाटील आणि शरद पवार गटाकडून रोहित पाटील यांच्यात मुख्य लढत आहे. मात्र रोहित पाटील नावाचे ४ आणि संजय पाटील नावाचे २ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याचं प्रकारे इस्लामपूर, इंदापूर, दापोली , कोरेगाव विधानसभेत ही एकाच नावाचे दोन, तीन किंवा यापेक्षा अधिक उमेदवार रिंगणात आहेत. (Assembly Election)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.