Maharashtra Assembly Election 2024 : धडक कारवाईत आत्तापर्यंत १० कोटी ७१ लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त

80
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेच्या तुलनेत विधानसभा निवडणूक मुंबईत गोंधळाविना

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करीता निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला असून निवडणुकीची आचार संहिता १५ ऑक्टोंबर, २०२४ पासून लागू झालेली आहे. आचारसहिंता कालावधीत स्थिर सर्वेक्षण पथकासह (SST) राज्य पोलीस दल, राज्य उत्पादन शुक्ल विभाग, राज्य वस्तु व सेवा कर या विभागांनी अवैद्य धंद्यांना आळा बसावा, यासाठी धडक कारवाई सुरु केली आहे. या कारवाईमध्ये आतापर्यंत १० कोटी ७१ लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त केला आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

(हेही वाचा – Assembly Election 2024: लालपरी विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज; ९ हजार बस निवडणूक कर्तव्यावर!)

विविध विभागांनी ११ नोव्हेंबरपर्यत विधानसभा मतदारसंघनिहाय केलेली धडक कार्यवाहीमध्ये मध्ये विविध मुद्देमाल जप्त केला.

  • २७१ चंदगड विधानसभा मतदारसंघ – रोख रक्कम 2 लाख, अवैध मद्य – 7 हजार 76.48 लिटर, मद्याची किंमत 27 लाख 8 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 2 लाख 32 हजार असे एकूण 31 लाख 40 हजार.
  • 272 राधानगरी विधानसभा मतदारसंघ – अवैध मद्य – 5 हजार 820.20 लिटर, मद्याची किंमत 16 लाख 41 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 42 हजार याप्रमाणे एकूण 16 लाख 83 हजार.
  • 273 कागल विधानसभा मतदारसंघ – रोख रक्कम 36 हजार, अवैध मद्य – 3 हजार 25.3 लिटर, मद्याची किंमत 6 लाख 99 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 10 लाख 93 हजार इतर अवैध मुद्देमाल 26 लाख 19 हजार याप्रमाणे एकूण 44 लाख 47 हजार
  • 274 कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ – रोख रक्कम 6 लाख 94 हजार, अवैध मद्य – 37 हजार 429 लिटर, मद्याची किंमत 39 लाख 77 हजार रुपये, अंमली पदार्थ 90 हजार, इतर अवैध मुद्देमाल 12 लाख 81 हजार याप्रमाणे एकूण 60 लाख 43 हजार.
  • 275 करवीर विधानसभा मतदारसंघ –अवैध मद्य – 20 हजार 803.78 लिटर, मद्याची किंमत 18 लाख 51 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 97 हजार याप्रमाणे एकूण 38 लाख 48 हजार
  • 276 कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ (Kolhapur North Assembly Constituency) – रोख रक्कम 15 लाख 62 हजार, अवैध मद्य – 1 हजार 267.05 लिटर, मद्याची किंमत 5 लाख 55 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 5 कोटी 58 लाख 72 हजार, इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 98 हजार याप्रमाणे एकूण 5 कोटी 86 लाख 87 हजार.
  • 277 शाहूवाडी विधानसभा मतदारसंघ – अवैध मद्य – 2 हजार 274.81 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 86 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 9 लाख 72 हजार याप्रमाणे एकूण 13 लाख 58 हजार
  • 278 हातकणंगले विधानसभा मतदारसंघ – रोख रक्कम 1 लाख 34 हजार, अवैध मद्य – 17 हजार 156.15 लिटर, मद्याची किंमत 17 लाख 67 हजार रुपये, मौल्यवान धातू (सोने, चांदी) 2 कोटी 3 लाख 77 हजार, इतर अवैध मुद्देमाल 14 लाख 61 हजार याप्रमाणे एकूण 2 कोटी 37 लाख 39 हजार
  • 279 इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ –अवैध मद्य – 2 हजार 96.56 लिटर, मद्याची किंमत 3 लाख 62 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 6 लाख 93 हजार याप्रमाणे एकूण 10 लाख 55 हजार
  • 280 शिरोळ विधानसभा मतदारसंघ – अवैध मद्य – 20 हजार 5.56 लिटर, मद्याची किंमत 11 लाख 16 हजार रुपये, इतर अवैध मुद्देमाल 19 लाख 88 हजार याप्रमाणे एकूण 31 लाख 3 हजार

असे एकूण रोख रक्कम 26 लाख 25 हजार, अवैध मद्य – 1 लाख 16 हजार 954.62 लिटर अवैध मद्याची किंमत 1 कोटी 50 लाख 62 हजार, अंमली पदार्थ 90 हजार, मौल्यवान धातू (सोने, चांदी इ.) 7 कोटी 73 लाख 42 हजार, इतर अवैध मुद्देमाल 1 कोटी 19 लाख 83 हजार असा एकूण 10 कोटी 71 लाख 3 हजार किंमतीचा मुद्देमाल विविध पथकांनी धडक कारवाईमध्ये जप्त केला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जिल्हयात 10 मतदार संघामध्ये स्थिर सर्वेक्षण पथकांची (SST) 44 स्थाने निश्चित करण्यात आली असून या ठिकाणी 128 स्थिर सर्वेक्षण पथकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच 41 VST, 22VVT, 75 FST पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच जिल्हयातील 8 तालुक्यात 15 जिल्हा व आंतरराज्य तपासणी नाके (चेकपोस्ट) उभारण्यात आले आहेत. याव्दारे जिल्हयात येणा-या व जाणा-या प्रत्येक वाहनांच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येत आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.