Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकरांसह ‘या’ २२ उमेदवारांना संधी  

80
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकरांसह ‘या’ २२ उमेदवारांना संधी  
Maharashtra Assembly Election 2024 : भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, पडळकरांसह ‘या’ २२ उमेदवारांना संधी  

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) भाजपाची दुसरी यादी (BJP Candidate List) जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाच्या या यादीत जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना संधी देण्यात आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे एकाच टप्प्यात मतदान येत्या २० नोव्हेंबर रोजी होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. 

दरम्यान, भाजपाची दुसरी यादी शनिवार २६ ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये  २२ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. तर पहिल्या यादीत ९९ उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसच्या धीरज देशमुख यांच्याविरोधात भाजपाने रमेश कराड (Ramesh Karad) यांना मैदानात उतरवल्याने ही लढत रंगतदार होण्याची शक्यता आहे. 

भाजपाच्या दुसऱ्या यादीत कोणकोणत्या २२ उमेदवारांचा समावेश? 

धुळे ग्रामीण – राम भदाणे 

मलकापूर – चैनसुख संचेती

अकोट – प्रकाश भारसाकळे 

अकोला पश्चिम – विजय अग्रवाल

वाशिम – श्याम खोडे 

मेळघाट – केवळराम काळे 

गडचिरोली – मिलींद नरोटे 

राजूरा – देवराव भोंगले

ब्रम्हपुरी – कृष्णलाल सहारे 

वरोरा – करण देवतळे

नाशिक मध्य – देवयानी फरांदे

विक्रमगढ – हरिश्चंद्र भोये

उल्हासनगर – कुमार आयलानी 

पेण – रवींद्र पाटील

खडकवासला – भिमराव तापकीर

पुणे – सुनील कांबळे

कसबा पेठ – हेमंत रासने

लातूर ग्रामीण – रमेश कराड 

सोलापूर शहर मध्य – देवेंद्र कोठे 

पंढरपूर – समाधान आवताडे

शिराळा – सत्यजित देशमुख

 जत – गोपीचंद पडळकर

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.