Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; कुडाळमधून निलेश राणेंना संधी

44
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; कुडाळमधून निलेश राणेंना संधी
Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर ; कुडाळमधून निलेश राणेंना संधी

राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठीच्या लढती निश्चित होत असून राजकीय पक्षांकडून शेवटच्या उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. कारण, विधानसभा (Vidhan Sabha) निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत मंगळवार 29 ऑक्टोबर पर्यंतच आहे. त्यामुळे, उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी तयारी करण्यास वेळ मिळावा, कार्यकर्ते व पदाधिकारी यांची राजी, नाराजी व बंडखोरी टाळली जावी, म्हणून पक्षांकडून खबरदारी घेतली जात आहे. यामुळेच रविवार 27 ऑक्टोबर रोजी शिवसेना पक्षाची विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे.  (Maharashtra Assembly Election 2024)

शिवसेनेने (Shivsena Candidate list)   दुसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. यामध्ये देखील दिग्गजांना संधी देण्यात आली आहे. आतापर्यंत शिवसेनेचे एकूण मिळून 65 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. कुडाळमधून निलेश राणेंना तिकीट देण्यात आले असून भावना गवळी यांना रिसोड या विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 20 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

यादीतील उमेदवारांची नावे:

अक्कलकुवा – आमश्या पाडवी

बाळापूर- बळीराम शिरसकर

रिसोड – भावना गवळी

हदगाव- बाबुराव कदम कोहळीकर

नांदेड दक्षिण- आनंद तिडके पाटील (बोंडारकर)

परभणी – आनंद शेशराव भरोसे

पालघर – राजेंद्र घेड्या गावित

बोईसर (अज) – विलास सुकुर तरे

भिवंडी ग्रामिण (अज) – शांताराम तुकाराम मोरे

भिवंडी पूर्व – संतोष मंजय्या शेट्टी

कल्याण पश्चिम – विश्वनाथ आत्माराम भोईर

अंबरनाथ (अजा) – डॉ बालाजी प्रल्हाद किणीकर

 विक्रोळी – सुवर्णा सहदेव करंजे

दिंडोशी – संजय ब्रिजकिशोरलाल निरुपम

अंधेरी पूर्व – मुरजी कांनजी पटेल

 चेंबूर – तुकाराम रामकृष्ण काते

 वरळी – मिलींद मुरली देवरा

 पुरंदर – विजय सोपानराव शिवतारे

 कुडाळ – निलेश नारायण राणे

 कोल्हापुर उत्तर – राजेश विनायक क्षिरसागर

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.