Maharashtra Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

92
Maharashtra Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज
Maharashtra Assembly Election 2024 : उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ‘या’ दिग्गज नेत्यांनी भरला उमेदवारी अर्ज

राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून, राजकारणी मंडळी विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत व्यस्त आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल होण्यास सुरुवात झालीय. २९ ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे, तर ३० ऑक्टोबर हा अर्जाची छाननी करण्याचा दिवस आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर आहे. तर २९ ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्यातील अनेक महत्त्वाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत. यावेळी मुंबई, ठाण्यासह राज्यभरात शक्तिप्रदर्शन करत आणि मिरवणूक काढत हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आले आहेत.  (Maharashtra Assembly Election 2024)

गुरुवारी अनेक दिग्गज नेत्यांनी अर्ज दाखल केल्यानंतर शुक्रवारी (२५ ऑक्टोबर) रोजी महत्त्वाच्या नेत्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. सहाव्यांदा देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दक्षिण-पश्चिम नागपूरमधून विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल केला. दुसरीकडे भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी सपत्नीक वांद्रे विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रताप सरनाईक यांनी चौथ्यांदा उमेदवारी अर्ज भरला आहे. तर याच मतदारसंघातून शिवसेना उबाठा गटाचे नरेश मनेरा यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. इंदापूरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दत्ता भरणे यांनी उमेदवारी अर्ज भरला असून, हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्ता भरणे असा दुहेरी सामना रंगणार आहे. तर रत्नागिरीत उदय सामंत (Uday Samant) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंबई शिवडीतून मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राजकारणात मला ठाकरे कुटुंबांने संधी दिली, बाळासाहेब आणि मीनाताई त्यांचा मी कायम ऋणी राहीनच, अशी प्रतिक्रिया अर्ज दाखल करताना मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी व्यक्त केली. नालासोपारा विधानसभेचे भाजपाचे उमेदवार राजन नाईक यांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे.  

 (हेही वाचा – Maharashtra Assembly Election 2024 : मनसेची ४ थी यादी जाहीर; ‘या’ उमेदवारांना मिळाली संधी) 

जिल्हाधिकारी कार्यालयात कडेकोट बंदोबस्त

उपमुख्यमंत्र्यांसोबत अर्ज भरण्याच्या वेळी विविध नेते असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त होता. संविधान चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गावरदेखील पोलीस तैनात होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.