महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजले असून, विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय उमेदवार अंतिम याद्या जाहीर होत आहेत. दरम्यान, रविवार २७ ऑक्टोबर रोजी शरदचंद्र पवार गटाची (SharadChandra Pawar group Candidate List) तिसरी यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये पहिल्या दोन यादीत शरदचंद्र पवार गटाने ६७ उमेदवारांची घोषणा केली होती. आता, तिसऱ्या यादीतून उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तत्पूर्वी जयंत पाटील (Jayant Patil) यांनी वांद्र रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेवरुन राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. (Maharashtra Assembly election 2024)
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शरदचंद्र पवार गटाची तिसऱ्या यादीची घोषणा केली. त्यामध्ये, पिंपरी चिंचवडसह, परळी मतदारसंघातही शरदचंद्र पवार गटाने आपला उमेदवार जाहीर केला आहे. तत्पूर्वी शनिवारी जयंत पाटील यांनी २२ उमेदवारांची घोषणा केली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी
१. करंजा – ज्ञायक पटणी
2. हिंगणघाट – अतुल वांदिले
3. हिंगणा – रमेश बंग
4. अणुशक्तीनगर – फहाद अहमद
5. चिंचवड – राहुल कलाटे
6. भोसरी – अजित गव्हाणे
7. माझलगाव – मोहन बाजीराव जगताप
8. परळी – राजेसाहेब देशमुख
9. मोहोळ – सिद्धी रमेश कदम
(हेही वाचा – Maharashtra Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील भुलेश्वरमध्ये मोठं घबाड सापडलं; १३२ कोटींची रोकड जप्त!)
शरद पवारांच्या राष्ट्रवादीची दुसरी उमेदवार यादी
- एरंडोल -सतीश अण्णा पाटील
2. गंगापूर -सतीश चव्हाण
3. शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे
5. बीड -संदीप क्षीरसागर
6. आर्वी -मयुरा काळे
7. बागलान -दीपिका चव्हाण
8. येवला -माणिकराव शिंदे
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी
13. जुन्नर- सत्यशील शेरकर
14. पिंपरी सुलक्षणा- शीलवंत
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम
17. अकोले- अमित भांगरे
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर
19. माळशिरस- उत्तमराव जानकर
20. फलटण -दीपक चव्हाण
21. चंदगड नंदिनीताई – भाबुळकर कुपेकर
22. इचलकरंजी- मदन कारंडे
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community