Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत ‘ते’ आमदार?

141
Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत 'ते' आमदार?
Maharshtra Assembly Election 2024 : ज्यांनी दिली बंडामध्ये साथ तेच झाले पहिल्या यादीतून बाद; वाचा कोण आहेत 'ते' आमदार?
भाजपानंतर आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली. मंगळवारी रात्री उशिरा ४५ जणांची यादी जाहीर करण्यात आली. जाहीर झालेल्या यादीमध्ये विद्यमान आमदार तसेच महत्त्वाचे सर्व मंत्री यांचा समावेश करण्यात आला आहे. परंतु या उठावामध्ये जे सोबत होते त्यातील तीन आमदारांना अजूनही पहिल्या यादीत स्थान न मिळाल्याने वेटे अँड वॉच च्या भूमिकेत राहावे लागत आहे.अडीच वर्षे आधी महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावत ज्यांनी हातात बंडाचा झेंडा घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ दिली त्यातीलच तीन आमदार शिवसेना शिंदे गटाच्या पहिल्या यादीतून सध्या तरी बाद झाले आहेत. (Maharshtra Assembly Election 2024)
कोण आहेत हे आमदार ?
या आमदारांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडून येणारे डॉ.बालाजी किणीकर (Balaji Kinikar,) ज्यांची सध्या चौथ्या टर्मची तयारी सुरू होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्या रात्रीच सुरत मार्गे गुहाटी ला जाणाऱ्यांमध्ये डॉक्टर बालाजी केणीकर यांचा पहिला क्रमांक होता. त्यामुळे घोषित झालेल्या पहिल्या यादीत त्यांचे नाव येईलच असा त्यांना ठाम विश्वास होता. परंतु मंगळवारी जाहीर झालेल्या शिवसेनाच्या पहिल्या यादीत मात्र त्यांना स्थान मिळू शकले नाही. त्यामुळेच अंबरनाथ परिसरात उलट सुलट चर्चांना उधाण आले आहे. शिवसेना शिंदे गटातील अंबरनाथ मधील मोठ्या गटाचा त्यांच्या उमेदवारीला विरोध असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव याच भागात खासदार म्हणून देखील आहेत. त्यांची देखील नाराजगी बालाजी किणीकर यांच्या वरती असल्याचे बोलले जाते. कदाचित याच कारणामुळे त्यांची उमेदवारी सध्या जाहीर करण्यास लांबणीवर पडल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात येते. (Maharshtra Assembly Election 2024)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या ठाण्यातून विद्यमान आमदार शांताराम मोरे (Shantaram More), विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir) यांनाही पहिल्या यादीत स्थान मिळाले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. एकनाथ शिंदे यांचा गड मानल्या जाणाऱ्या ठाण्यात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून धूसफूस सुरु असल्याचे समोर आले आहे. स्थानिक रोषामुळे एकनाथ शिंदे आणि भाजपाने नरमाईची आणि सावध भूमिका घेतल्याचे दिसतेय. परंतु २०२२ मधील बंडामध्ये साथ देणाऱ्या सर्वांना पहिल्या यादीत स्थान मिळेल, असाच अंदाज असताना आपल्याच गडामधील तीन विद्यमान आमदारांना मात्र वेटिंगवर ठेवण्यात आलेय. त्यामुळे ठाण्यात चर्चा सुरु झाल्या आहेत. (Maharshtra Assembly Election 2024)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.