राज्यात विधानसभा निवडणुकांचे वारे आता जोमात वाहू लागले आहेत त्यामुळेच आता राजकीय धुराळा उडू लागला आहे. आज राज्यभरात बड्या नेत्यांचे ठिकठिकाणी राजकीय सभा होणार आहेत. यामध्ये पंतप्रधानांसह केंद्रीय गृहमंत्री हे देखील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या आखाड्यात उतरणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
पंतप्रधान दुपारी बारा वाजता धुळेमध्ये तर नाशिकमध्ये दुपारी दोन वाजता सभा घेणार आहेत. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (HM Amit Shah) सांगलीत दोन सभा, सातारा, कोल्हापूरच्या इचलकरंजी मध्ये जाहीर सभा घेणार आहेत. तर दुसऱ्या फळीतील उत्तर भारतीय नेते म्हणून ओळखले जाणारे खासदार मनोज तिवारी हे नालासोपारा भागात, कांदिवली पोईसर भागात रोड शो करणार आहेत. तर भाजपच्या नेत्या स्मृती इराणी यादेखील विलेपार्ले, कल्याण पूर्व, बोरिवली, वसई नालासोपारा, तसेच मीरा-भाईंदर परिसरामध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार करणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या आज सहा सभा होत आहेत शिंदे करमाळा परांडा, बार्शी धाराशिव आणि उमरगा पुण्यामध्ये सभा घेणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांची अमरावती, नागपूर मध्ये सभा घेणार आहेत तर अजित पवार वडगाव हडपसर आणि पिंपरी मध्ये आज सभा घेणार आहेत. तर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या अजित पवारांसाठी बारामती विधानसभा मतदारसंघात गावभेटी करणार आहेत. तर इकडे महाविकास आघाडी कडून उद्धव ठाकरे बुलढाणा, मेहकर आणि जालनाच्या परतुर मध्ये सभा घेणार आहेत. शरद पवार वर्धा मधील हिंगणघाट आणि हिंगोली मध्ये सभा घेणार आहेत राज ठाकरे आज गुहागर नवी मुंबई आणि विक्रोळी मध्ये सभा घेणार आहेत. (Maharashtra Assembly Election 2024)
राज्यभरात होत असलेल्या या सभांमधून सत्ताधारी महायुतीचे नेते महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या कारभारावरती हल्ला करतील. तर महाविकास आघाडीचे नेते हे देखील सध्या सत्तेवर असणाऱ्या महायुतीच्या कारभारावरती हल्ला चढवणार आहेत. असे असले तरी मात्र मतदार राजा देखील या राजकीय कुस्तीला कसा पाहतो आणि आपले मत कुणाच्या पारड्यात टाकतो हे तर येणाऱ्या २३ नोव्हेंबर रोजी कळेल. (Maharashtra Assembly Election 2024)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community