Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर, ‘या’ भागातून करणार सुरुवात 

138
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर, ‘या’ भागातून करणार सुरुवात 
Maharashtra Assembly Election 2024 : उद्धव ठाकरे ५ नोव्हेंबरपासून राज्याच्या दौऱ्यावर, ‘या’ भागातून करणार सुरुवात 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी शेवटची तारीख होती. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांना प्रचाराचे वेध लागले आहेत. शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) 5 नोव्हेंबरपासून प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. पहिली सभा रत्नागिरी येथे होणार आहे. कोकणातून ते आपल्या पक्षाचा आणि महाविकास आघाडीच्या प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मिळालेल्या माहितीनुसार, 5 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर दरम्यान शिवसेना उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कालावधीत ते महाराष्ट्रातील विविध भागात जाणार आहे. दरम्यान, दौऱ्याची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातून होईल आणि 17 नोव्हेंबर रोजी मुंबईत सांगता सभा होणार आहे.

(हेही वाचा – Shiv Sena UBT उमेदवाराचा ३०-वर्षीय कमावता मुलगा अवलंबीत?)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात 16 नोव्हेंबर रोजी उबाठा गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सभा घेऊन जनतेला संबोधित करणार आहेत. ठाकरे यांच्या विधानसभा निवडणुक काळात 20 ते 25 जाहीर सभा होणार असल्याची माहिती शिवसेना उबाठा गटाच्या वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याही सभा होणार आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी आता 288 मतदारसंघातील लढती निश्चित झाल्या असून महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार आहे. त्यामुळे, या लढाईत सर्वच राजकीय पक्षांचे नेते आपलं सर्वस्व पणाला लावून मैदानात उतरले आहेत. त्यामध्ये, राज्यातील ठाकरे, पवार, फडणवीस, शिंदे आणि काँग्रेसमधील दिग्गज नेते स्वत:निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.