-
प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षपदासाठी बुधवार दि. २६ मार्च २०२५ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे (Anna Bansode) यांनी मंगळवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विधानभवनात झालेल्या या अर्ज दाखल करण्याच्या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
(हेही वाचा – Pune Crime : दौंडमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अर्भकांचे अवयव; महिला आयोगाच्या ट्वीटनंतर खळबळ)
अण्णा बनसोडे (Anna Bansode) हे पिंपरी मतदारसंघातून सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्या अनुभवाला आणि पक्षनिष्ठेला पाहता महायुतीने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. अर्ज दाखल करताना बनसोडे (Anna Bansode) यांनी महायुतीच्या नेत्यांचे आभार मानले आणि विधानसभेच्या कामकाजात योगदान देण्याची तयारी दर्शवली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “अण्णा बनसोडे यांचा अनुभव आणि प्रामाणिकपणा यामुळे ते या पदासाठी योग्य उमेदवार आहेत.”
(हेही वाचा – Disha Salian Case : उद्धव ठाकरे यांना केले आरोपी; आदित्य ठाकरेंचा ड्रग्सच्या व्यापारात हात, वकील नीलेश ओझा यांचा दावा)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बनसोडे (Anna Bansode) यांच्या उमेदवारीला पाठिंबा देत महायुतीच्या एकजुटीवर भर दिला. ही निवडणूक बुधवारी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान पार पडणार असून, महायुतीचे संख्याबळ पाहता बनसोडे यांची निवड निश्चित मानली जात आहे. या निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community