Maharashtra Assembly Election: ‘या’ दिवशी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; ११० नावांवर शिक्कामोर्तब

159
Maharashtra Assembly Election: 'या' दिवशी भाजपाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; ११० नावांवर शिक्कामोर्तब

भाजपाच्या केंद्रीय निवडणूक (Maharashtra Assembly Election) समितीची बुधवारी (१६ ऑक्टो.) दिल्लीत महत्त्वाची बैठक झाली. भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यामध्ये भाजपच्या 110 जागांचा (BJP Candidate List Maharashtra) निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. तसेच येत्या शुक्रवारी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार असल्याचीही माहिती मिळत आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा-Vegetables Price Hike : भाजीपाल्यांचे दर वाढले, गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र)

भाजपाच्या 105 मतदारसंघांवर आणि समर्थन देणाऱ्या इतर 11 आमदारांच्या जागांवर चर्चा झाली. त्यानंतर जवळपास 110 जागांचा निर्णय अंतिम झाल्याची माहिती आहे. भाजपकडून 110 जागांवर अंतिम निर्णय झाला असून येत्या शुक्रवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामध्ये एकूण 30 टक्के उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा-न्यायमूर्तींच्या ग्रंथालयातील न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी काढली, CJI D Y Chandrachud यांचा मोठा निर्णय)

तीन दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने महायुतीच्या भ्रष्टाचाराचा पंचनामा करणारा रिपोर्ट प्रसिद्ध केला होता. त्याला महायुतीकडून रिपोर्ट कार्डनं उत्तर देण्यात आलं आहे. अडीच वर्षात केलेल्या कामांचं महायुतीकडून (Mahayuti) रिपोर्टकार्ड सादर करण्यात आलं. त्यात विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर उत्तर देण्यात आलं आहे. त्यात लाडकी बहीण, शेतकऱ्यांना मोफत वीज, नदीजोड प्रकल्प यासारख्या योजनांचा उल्लेख करण्यात आला आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.