Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?

120
Maharashtra Assembly Election : सट्टा बाजारचा कौल कोणाला? महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार?
  • प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवार २० नोव्हेंबर रोजी पार पडले. आता प्रत्येकाचे लक्ष निकालाकडे लागले आहे. अनेकांकडून वेगवेगळे भाकीत केले जात असले तरी महायुतीला सर्वांनी पसंती दिल्याचे निकालापूर्वीच्या एक्झिट पोल वरून दिसून येत आहे. सट्टा बाजारात देखील महायुतीचा बोलबाला असून राज्यात महायुतीच सत्ता स्थापन करणार असल्याचे सट्टे बाजारातील आकडेवारीतून समोर येत आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Hardik Pandya : हार्दिक पांड्या टी-२० अष्टपैलू खेळाडूंमध्ये अव्वल)

भारतात निवडणुका जाहीर होताच, सट्टा बाजारात तेजी येते. मग ती कुठल्या पक्षाकडून कुणाला उमेदवारी देण्यात येण्यापासून ते निवडून येण्यापर्यंत आणि शेवटी सत्ता स्थापन करेपर्यंत सट्टा लावला जातो. राज्यातील विधानसभा निवडणूक-२०२४ वर कोट्यवधींचा सट्टा लावण्यात आला असून भाजपा आणि मित्रपक्षाला ४० पैसे तर काँग्रेस आणि मित्रपक्ष यांना २ रुपये ते २.५ रुपये दर सट्टा बाजारात लागलेला आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – भाजपाचा अपक्षांच्या बाबतीत विचार काय? Chandrashekhar Bawankule म्हणाले…)

सट्टा बाजारात महायुतीचे १४२ ते १५० उमेदवार निवडून येतील तर महाविकास आघाडी १३६ ते १४० चा आकडा पार करतील असा कौल सट्टा बाजाराने दिला आहे. भाजपा ८७ ते ९० सीट पर्यंत मजल मारणार असून शिवसेना (शिंदे) हे ४० चा आकडा पार करतील तसेच अजित पवार गटाला १८ ते २० जागा मिळण्याची शक्यता सट्टा बाजारात वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष ६० ते ६२ राष्ट्रवादी (श.प) ५० ते ५५ आणि उबाठा शिवसेना ३५ ते ३८ जागा मिळतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. एकंदरीत सट्टा बाजारात महायुतीच सरस असून राज्यात महायुतीचेच सरकार येणार असल्याचा कौल सट्टा बाजाराने दिला आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.