Maharashtra Assembly Election डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता

202
Maharashtra Assembly निवडणूक डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता
Maharashtra Assembly निवडणूक डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता

महाराष्ट्राचे मतदान डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लाडकी बहीण योजनेचे आणखी 2 ते 3 हप्ते जास्तीत जास्त महिलांच्या खात्यावर जमा व्हावे, यातून महिलांचे मतदान आपल्याला व्हावे, यासाठी निवडणूक लांबणीवर गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते, अशी शक्यता आहे, असे वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – Maharashtra Assembly Election डिसेंबरमध्ये ?; नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता)

झारखंड विधानसभा निवडणुकीसोबत महाराष्ट्रातील निवडणुका होतील, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. विधानसभेची मुदत संपल्यानंतर निवडणुका होणार असल्याने नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक महिलांनी लाडकी बहिण योजनेसाठी अर्ज केले आहे. मात्र, त्यांचे अर्ज अजून स्वीकारले गेले नाहीत. ही योजना व्यापक करण्यासाठी नवे अर्जही भरून घेतले जात आहेत, पण किमान महिनाभर तरी हे अर्ज भरुन घेण्याचे काम पूर्ण होईल असे दिसत नाही, यामुळे अर्ज भरण्यासाठी वेळ वाढून देण्यात येईल, अशी शक्यता आहे.

जम्मू-काश्मीर व हरियाणाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यांतील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. गेल्या तीन निवडणुकांमध्ये हरियाणा व महाराष्ट्रातील निवडणुकांची घोषणा एकाच वेळी झाली होती. या वेळी महाराष्ट्रातील निवडणूक जाहीर करण्यात आली नाही. पत्रकार परिषदेत केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी, महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तारखा जम्मू-काश्मीरमधील मतदान पूर्ण झाल्यावरच जाहीर केल्या जातील, असे स्पष्ट केले.

जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. म्हणजेच चार ऑक्टोबरच्या मतमोजणीनंतर आठवडाभराचा अवधी तरी घोषणेसाठी दिला जाईल. निवडणुकांच्या घोषणेनंतर 45 दिवसांचा कालावधी मिळतो. त्यामुळे ऑक्टोबरच्या अखेरच्या टप्प्यात आचारसंहिता लागू होईल, असा अंदाज आहे.

महाराष्ट्राच्या प्रश्नावर काय म्हणाले आयुक्त ?

महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी असा प्रश्न विचारणं सोपं आहे, असे ते म्हणाले. पुढे ते म्हणतात की, महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. या वेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी गरज पडली, तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू केली जाईल, असे संकेत दिले आहेत. कोणत्याही राज्यामधील विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांमध्ये निवडणूक घेण्याची मूभा निवडणूक आयोगाला असते. त्यामुळेच विद्यमान विधानसभा 26 नोव्हेंबरला बरखास्त झाली आणि निवडणूक डिसेंबर होणार असेल तर मधल्या कालावधीमध्ये राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता आहे. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.