- विशेष प्रतिनिधी, मुंबई
माहीम विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्या प्रचारासाठी आई शर्मिला आणि त्यांची पत्नी मिताली या निवडणूक प्रचारात उरल्यानंतर शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांची मुलगी प्रिया आणि उबाठा शिवसेनेचे उमेदवार महेश सावंत यांची पत्नीही निवडणूक प्रचारासाठी रस्त्यावर उतरल्याने या मतदारसंघात कुटुंब प्रचारात रंगल्याचे दिसून येत आहे.
दादर माहीम विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सदा सरवणकर, उबाठाचे शिवसेनेचे महेश सावंत आणि मनसेचे अमित राज ठाकरे हे निवडणूक रिंगणात उतरले असून आता प्रचार टिपेला पोहोचला आहे. त्यामुळे उमेदवारांकडून प्रतिस्पर्ध्यांचा समाचार घेऊन आरोप प्रत्यारोप केले जात आहे. मात्र, प्रत्येक उमेदवारांकडून मतदारांपर्यंत पाहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे प्रचाराची तोफ येत्या सोमवारी सायंकाळी थंडावली जाणार असल्याने त्याआधी प्रचाराची फेरी पूर्ण करण्यासाठी प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आणि उमेदवारांचे नातेवाईक व्यक्तीशा प्रचारात उतरलेले पहायला मिळत आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Kolhapur जिल्ह्यातील विधानसभेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार?)
मनसेचे उमेदवार अमित राज ठाकरे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मिताली या कायम असतात. प्रचारात पत्नीसोबतच अमित प्रचारात फिरत असल्याने प्रत्येक ठिकाणी राज ठाकरे यांच्या सुनबाईंचे कौतुक होत आहे. तसेच प्रत्येक मतदारांकडून त्यांना प्रतिसाद मिळताना दिसत आहे. साक्षात राज साहेबांची पत्नी आणि त्यांची सुनबाई आपल्या दरवाजात आल्याने मतदारांमध्ये वेगळाच उत्साह पहायला मिळत असून आता प्रत्यक्षात मिळणारा प्रतिसाद मतांमध्ये रुपांतर झालेला दिसतो का हे आता पाहायचे आहे.
दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार सदा सरवणकर यांच्या प्रचारासाठी त्यांची कन्या प्रिया सरवणकर गुरव याही मैदानात उतरल्या असून प्रचारसभेतील तडाखेबंद भाषणासह विभागातील जनतेकडूनही त्याना आता चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – रशिया-युक्रेन युद्धावर Donald Trump काय म्हणाले ?)
तर उबाठा शिवसेनेचे महेश सावंत यांच्या पत्नीही नवऱ्याच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेली पहायला मिळत असून उबाठा शिवसेनेकडे महिला आणि पुरुष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची मोठी फौज असल्याने प्रत्यक्षात ते प्रचारात असल्याने प्रचाराच्या या रणधुमाळीत मनसे आणि शिवसेनेच्या तुलनेत उबाठा शिवसेनेचा उमेदवार बाजी मारताना दिसत असला तरी लोकांच्या मनात काय आणि प्रत्यक्षात मतदान कुणाच्या बाजूने केले जाते हे येत्या २० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानातूनच समोर येईल. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community