- प्रतिनिधी
महाराष्ट्रात निवडणुकीचा प्रचार जोरात सुरु आहे. महाविकास आघाडी बाजी मारेल की महायुती सत्ता स्थापन करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक क्षणाला उत्कंठा वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी भाषिकांसोबतच महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या मराठी लोकांनाही आपल्या महाराष्ट्रात कुणाची सत्ता स्थापन होईल याची उत्सुकता निर्माण झाली आहे. यासाठी दिल्लीमध्ये राहणाऱ्या मराठी भाषिकांची मत जाणून घेतली असता महाराष्ट्राला विकासात अग्रेसर करणाऱ्या पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे. असे मत अनेकांनी मांडले. तर काहींनी नेमकं कोण जिंकून येईल सांगता येत नसल्याचे स्पष्ट केले. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Sajjad Nomani यांचा नवा जिहादी संदेश; म्हणाले, महाराष्ट्रात भाजपा हरला, तरच दिल्ली सरकार लवकर कोसळेल; आमचे लक्ष्य दिल्ली)
दिल्ली मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वैभव डांगे म्हणाले की, मतदान करताना जनतेने अतिशय सावध राहायला हवे. राज्याला विकासासाठी सोबत देणाऱ्या नेत्यांनाच निवडून द्यायला हवे. आपल्या राज्यातील प्रकल्प इतर राज्यात जाणार नाही, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. आपला महाराष्ट्र पुरोगामी आणि विकासासाठी ओळखला जातो. ती ओळख कायम असायला हवी. जातीच्या राजकारणाचे विष राज्यात पेरलं जाणार नाही याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आपला सुसंस्कृतपणा कायम ठेवून जाती पातीच्या भिंती पाडायला हव्या. बुलेट ट्रेन सारखा महत्त्वाचा प्रकल्प राज्यबाहेर गेला. असे कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प राज्यबाहेर जाऊ नये, यासाठी कार्यरत असणाऱ्या पक्षांची सत्ता असणे गरजेचे आहे. तसेच विकासाच्या मुद्द्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे. (Maharashtra Assembly Election)
(हेही वाचा – Kolhapur जिल्ह्यातील विधानसभेच्या आखाड्यात कोण बाजी मारणार?)
पुणे, मुंबई, नागपूर या शहराप्रमाणे इतर शहराचाही जोमाने विकास व्हायला हवा. खरं तर सुरुवातीला महाविकास आघाडीचे सरकार येईल असं वाटत होतं. मात्र आता महायुतीचे सरकार येईल असे मनापासून वाटते. कारण लाडकी बहीण योजना सारख्या कल्याणकारी योजनांमुळे चित्र पूर्णपणे बदलले आहे. महायुतीचे सरकार सत्तेत येण्याची पूर्ण शक्यता वैभव डांगे यांनी व्यक्त केली. तर समाजसेविका संयुक्ता देशमुख म्हणाल्या की, सध्या कुणाची सत्ता येईल सांगता येत नाही. मात्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावे असे वाटते, जेणेकरून राज्यात विकास सुरू होईल. कारण राज्यात स्थिर सरकारची गरज आहे. राज्यात विकास व्हावा, रोजगार संधी निर्माण करण्यासाठी खमक्या नेतृत्वाची गरज आहे. ती सक्षम नेतृत्व असलेला पक्ष सत्तेत आला पाहिजे, यामुळे महायुतीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास वाटतो. तर प्रोफेसर स्मिता जाजू म्हणाल्या की, राज्यातील आस्थिरता संपविण्यासाठी भाजपाची सत्ता असणे आवश्यक आहे. यामुळे महायुती सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही. तरी देखील अपक्ष जास्त असल्यामुळे कोण जिंकेल याची उत्कंठा निर्माण झाली आहे. व्यवसायाने वकील असलेले सुदीप परांजपे म्हणाले की, महाविकास आघाडी सत्तेत असो वा महायुती सत्तेत असो. दोघांनी देखील राज्याला प्रगतीपथाकडे न्यावे. कारण कोणत्याच परिस्थितीमध्ये राज्यात विकास थांबू नये एवढेच वाटते. (Maharashtra Assembly Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community