Maharashtra Assembly Election : निवडणुकीपूर्वीच आमदारांनी खर्च केले महापालिकेचे ६५० कोटी रुपये

327
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
Maharashtra Assembly Election 2024 : प्रचार थांबला, आता चूहा मिटींग जोरात
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आल्याने नगरसेवक नसल्याने आमदारांच्या माध्यमातून मुंबईतील विकासकामांसाठी महापालिकेच्यावतीने निधीची तरतूद करण्यात आली होती. मागील वर्षी १२६० कोटी रुपये तर चालू आर्थिक वर्षांत १०५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. परंतु मागील वर्षी मुंबईतील आमदारांकडून तब्बल ६५० कोटी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election)

मुंबई महापालिकेत प्रशासक नियुक्त असल्याने सन २०२३-२४ या वर्षांत मुंबईतील ३६ विधानसभा क्षेत्राकरता एकूण १२६० कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्यात आली होती. या तरतुदींमधून शहर आणि उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या मंजुरीने आमदारांनी सुचवलेल्या विकासकामांना मंजुरी दिली जायची आणि त्यानुसार विकासकामांना निधी मंजूर केला जायचा. त्यानुसार सन २०२३-२४ या वर्षांत तब्बल ६५० कोटी रुपयांचा निधी खर्च झाल्याची माहितीची माहिती अधिकारातून समोर आली आहे. (Maharashtra Assembly Election)

(हेही वाचा – काँग्रेसशासित राज्यांमध्ये जनतेची केवळ फसवणूकच; BJP नेत्यांनी केली पोलखोल)

महापालिकेच्या २४ विभाग कार्यालयांमध्ये तरतूद केलेल्या निधीपैंकी सर्वांधिक निधी घाटकोपरमधील भाजपाचे राम कदम आणि पराग शाह यांना विभाग कामांसाठी ६५.४९ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर कांदिवली, चारकोप या विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले अतुल भातखळकर आणि योगेश सागर यांनी आपल्या मतदारसंघात ६२.८८ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. तर महापालिकेच्या के पश्चिम विभाग कार्यालयाच्या हद्दीत वर्सोवा आणि अंधेरी पश्चिम विधानसभा क्षेत्र असून या दोन्ही विधानसभेतील विकासकामांसाठी अनुक्रमे डॉ. भारती लव्हेकर आणि अमित साटम यांनी ५९.८९ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. तर एल विभाग कार्यालयाच्या हद्दीत चांदिवली आणि कुर्ला नेहरुनगर हे मतदारसंघ येत असून या दोन्ही मतदारसंघात अनुक्रमे दिलीप लांडे आणि मंगेश कुडाळकर यांनी ५९.१८ कोटी रुपयांचा निधी खर्च केला आहे. (Maharashtra Assembly Election)

विक्रोळी आणि भांडुप विधानसभेत एकही पैसा खर्च झालेला नसून भायखळा मतदार संघात ३०.७० कोटी रुपये आणि एफ उत्तर विभागात मोडणाऱ्या शीव कोळीवाडा, वडाळा विधानसभा आणि प्रसाद लाड हे विधानसभा परिषद सदस्य असल्याने या तिन्ही विधानसभा मतदारसंघातील विकासकामांसाठी ३६.१८ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. महापालिका अस्तित्वात नसल्याने मुंबईच्या नागरी सुविधा विकास कामांना खिळ बसू नये यासाठी आमदारांना पालकमंत्र्यांच्या मंजुरीने निधी उपलबध करून दिला होता. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे चालू आर्थिक वर्षांतही मुंबईतील ६ लोकसभा खासदार, ६ राज्य सभा खासदार, ३६ विधानसभा सदस्य आणि १२ विधान परिषद सदस्य अशाप्रकारे एकूण ६० लोकप्रतिनिधींसाठी एकूण १०५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आला. (Maharashtra Assembly Election)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.